शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या परिपत्रकाची खंडपीठाकडून दखल

By admin | Updated: July 16, 2017 00:36 IST

औरंगाबाद : अपहारप्रकरणी बडतर्फ वाहकांना (कंडक्टर्स) ‘कुटुंब सुरक्षा योजने’अंतर्गत पुनर्नेमणूक देण्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकाचीखंडपीठाने स्वत:हून दखल घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अपहारप्रकरणी बडतर्फ वाहकांना (कंडक्टर्स) ‘कुटुंब सुरक्षा योजने’अंतर्गत पुनर्नेमणूक देण्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकाची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर आणि न्या. आर. एम. बोर्डे यांच्या खंडपीठाने स्वत:हून दखल घेऊन ‘हे परिपत्रक जनहिताच्या विरुद्ध’ असल्याचे मत नोंदवीत, यासंदर्भात ‘सुमोटो जनहित याचिका’ दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या प्रबंधकांना नुकताच दिला.अपहाराच्या आरोपावरून बडतर्फ वाहकांच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ देण्यासाठी ‘कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत पुनर्नेमणूक देण्याची राज्य परिवहन महामंडळाची ही योजना ‘अपूर्व’ (नॉव्हेल) आहे. महामंडळाच्या निधीचा अपहार केल्याच्या कारणावरून ज्यांना बडतर्फ केले आहे, ‘अशांना’ पुनर्नेमणूक’ देणे हे व्यथित करणारे (पेनफुल) असल्याचा स्पष्ट उल्लेख खंडपीठाने केला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे परिपत्रक महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी ६ आॅगस्ट २०१६ रोजी प्रादेशिक कार्यालयांना वरील परिपत्रक पाठविले होते. त्यात अपहारप्रकरणी बडतर्फ वाहकांना ‘कुटुंब सुरक्षा योजनें’तर्गत अटी व शर्तीनुसार पुन्हा नेमणूक देण्याबाबत कारवाई करण्याचे आदेशित केले होते. परिपत्रकानुसार महामंडळास आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वाहकांवर सोपविण्यात आली आहे. काही वाहक महामंडळाच्या रकमेचा विविध प्रकारे अपहार करतात. विहित कारवाईनंतर अशा वाहकांना शिक्षा देऊन बडतर्फ केले जाते. काही प्रकरणे न्यायालयात जातात, त्यामुळे महामंडळाचे तसेच वाहकांचे आर्थिक नुकसान होते. बडतर्फ वाहकांच्या चुकीमुळे कुटुंबियांची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी यासाठी ‘कुटुंब सुरक्षा योजने’अंतर्गत बडतर्फ वाहकांना पुन्हा नेमणूक देण्याचे आदेशित केले होते. पुनर्नेमणूक देताना संबंधित वाहकाचे वय १ एप्रिल २०१६ रोजी ४५ वर्षांपेक्षा जादा नसावे, अशी एक अट आहे.