शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रमाणपत्रे मिळणार सर्कलमध्येच

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते.

जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन किंवा महासेतू केंद्र गाठून प्रमाणपत्रांसाठी ताटकळत बसावे लागते. परंतु जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक बुधवारी किमान दोन सर्कलमध्ये अशा प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे ठरविले आहे.जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते. जात प्रमाणपत्र, रहिवासी, इन्कमटॅक्स, सातबारा, जन्म-मृत्यू इत्यादी प्रकारचे प्रमाणपत्र वेळेवर मिळणे गरजेच असते. त्यासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थांना आता आपल्या गावात, गावाजवळच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधीच्या सूचना केल्या. काही प्रमाणपत्र वितरणाच्या ठिकारी जिल्हाधिकारी नायक हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारची प्रमाणपत्रे महासेतू, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालय असा प्रवास केल्यानंतरच मिळतात. जालन्याच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी गेल्या महिन्यात लाभार्थ्यांना एकाच दिवशी कार्यालयात बोलावून जात प्रमाणत्रांचे वितरण केले होते. अशाच प्रकारे प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. (प्रतिनिधी)