शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सिडकोत पुन्हा पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: June 10, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सिडको- हडकोतील वसाहतींचा पाणीपुरवठा पुन्हा कोलमडला आहे. काल ८ जून रोजीचा पाणीपुरवठा ९ जूनच्या दुपारपर्यंत सुरळीत झालेला नव्हता.

औरंगाबाद : सिडको- हडकोतील वसाहतींचा पाणीपुरवठा पुन्हा कोलमडला आहे. काल ८ जून रोजीचा पाणीपुरवठा ९ जूनच्या दुपारपर्यंत सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी पालिकेच्या अभियंत्यांना विचारणा केली. सिडको- हडकोसाठी टाकण्यात आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवर ६ ठिकाणी बायपास आहे. मागील दीड महिन्यापासून सातत्याने सिडको- हडकोतील २२ वॉर्डांचा पाणीपुरवठा कोलमडतो आहे. त्यामागील कारणे शोधण्याऐवजी मनपा सत्ताधारी व अधिकारी बैठकींच्या सत्रात जुंपले आहेत. पाण्याची गळती, चोरी, महावितरणचा लपंडाव, अशी काही कारणे सांगून मागील महिन्यापासून पालिका वेळकाढू धोरण अवलंबित आहे. मात्र, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नगरसेविका ऊर्मिला चित्ते यांनी आठ तासांच्या गॅपने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला. यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ म्हणाले की, आज महावितरणकडून काहीही अडचण आली नाही. सुरळीत पाणीपुरवठा झालेला आहे. सहा ठिकाणी राजकीय बायपासएक्स्प्रेस जलवाहिनी सिडको- हडकोसाठी टाकण्यात आली असली तरी तिला सहा ठिकाणी बायपास करण्यात आले आहे. सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल जलकुंभ, मरीमाता, शिवाजीनगर या ठिकाणांहून त्या जलवाहिनीतील पाणी दुसरीकडे पुरविले जाते. वसाहती वाढल्यामुळे राजकीय बायपास करून पाणी वळविले गेले. त्यामुळे सिडको- हडकोला पाणी कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षणमंत्र्यांकडून कानउघाडणीशिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि शहर अभियंता एस.डी. पानझडे यांची पाणीपुरवठ्यावरून जोरदार कानउघाडणी केली. ३ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा शब्द डॉ. कांबळे, पानझडे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिला. काही वॉर्डांमध्ये भरमसाट पाणीपुरवठा होतो आहे, तर कुठे पाण्यासाठी आठ-आठ दिवस वाट पाहावी लागत आहे. ‘जिसकी लाठी, उसकी भैस’ अशा पद्धतीने मनपाचा कारभार सुरू आहे. रोशनगेट, जिन्सी, गारखेडा, सिडको- हडको या वसाहतींमध्येच अडचणी निर्माण का होत आहेत, महावितरणचे कारण सांगितले जात आहे, अचानक अडचणी येण्यामागचे कारण काय? असा सवालही शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शहर अभियंत्यांना केला.एक्स्प्रेस जलवाहिनीच्या हेतूला ‘छेद’२००१ साली सिडको- हडकोतील सुमारे २५ हजार नळधारकांसाठी १,२०० मि.मी. व्यासाची एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली. ती जलवाहिनी सिडकोतील वाढत्या लोकसंख्येला समोर ठेवून टाकण्यात आली होती. त्या जलवाहिनीचे पाणी सध्या कमी पडते आहे. २२ वॉर्डांतील लोकसंख्या १४ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्याने सिडको- हडकोची तहान वाढली आहे. पालिकेकडे आहे तीच यंत्रणा असल्यामुळे हा सगळा त्रास होत असल्याचे दिसते.