शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

सिडको पूल धोकादायक ठरणार

By admin | Updated: April 28, 2016 00:12 IST

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको येथील उड्डाणपुलाचे बांधकाम धोकादायकरीत्या झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

संदीप मानकर अमरावतीअमरावती शहरात दररोज ३० ते ५० हजार किलो आंब्यांची विक्री केली जाते. हे आंबे पिकविण्यासाठी तब्बल आठशे ते हजार किलोेग्रॅम कॅल्शियम कार्बाईड या अत्यंत घातक रसायनाचा वापर फळबाजारात खुलेआम केला जात आहे. रोज मृत्यू असा धडाकेबाजपणे विकला जात असताना ‘तुम्हीच दाखवा कार्बाईड’, असा उफराटा सवाल धृतराष्ट्र झालेल्या अन्न व औषधी प्रशासनाचा आहे. कॅल्शियम कार्बाईड हे रसायन पेशींमध्ये जीवघेणा दाह निर्माण करते. असह्य उष्म्यामुळेच हिरवेकंच आंबे दोन ते तीन दिवसांत चक्क पिकतात. खरे तर पिकण्याची प्रक्रिया त्यांच्यात झालेलीच नसते. क्षमतेपेक्षा अधिक दाह सहन न झाल्याने कच्च्या आंब्यांवर झालेला तो विपरित परिणाम असतोे. आंब्यांची नैसर्गिक चव म्हणूनच या कृत्रिमरित्या पिकविलेल्या आंब्यांना येत नाही. आंबे करा ना सील !अमरावती : कॅल्शियम कार्बाईडशी संयोग झाल्याने आंब्यांमध्येही त्या घातक रसायनांचे अवशेष प्रविष्ट होतात. मानवी शरीरात पचवले न जाणारे ते अवशेष आंब्यांमार्फत आपल्या शरीरात अलगदपणे पोहोचतात. पेशींची मूळ रचना बदलविण्याची क्षमता असलेले हे रसायन मानवी शरीरातील घसा, आतडे, पचनसंस्था, लिव्हर, किडनी, मुत्रपिंड आणि गुद््द्वार या अवयवांतील पेशींची रचना बदलवू शकतात. तोच कॅन्सर. सतत कॅल्शियम कार्बाईडयुक्त अन्नाचे सेवन झाल्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो, हे स्पष्ट असतानाही शहरात दररोज हजार किलोे कॅल्शियम कार्बाईडचे अवशेष नागरिकांच्या शरीरात बिनधोकपणे पोचविले जात आहेत. आंब्यांचा माच दिसेनासापूर्वी एका खोलीत आंबे पसरवून त्यावर तणसाचा थर रचला जायचा. काही दिवस ती खोली बंद असायची. जाती-प्रजातींनुसार ठराविक कालावधीत आंबट आंबे गोड व्हायचे. आंबे पिकविण्याची ही नैसर्गिक पध्दती आता नाहिशी झाली आहे. त्यासाठी लागणारी जागा, आवश्यक असलेला लांब कालावधी आणि मनुष्यबळ या साऱ्यांनाच फाटा देऊन कार्बाईडची सहज-सोपी पध्दती सर्वत्र अवलंबली जात आहे. हे करा ना!शहरातील विविध ठिकाणांहून सील केलेले आंबे अन्न व औषधी प्रशासनाने तपासणीला पाठविल्यास त्यात कार्बाईडचा अंश नक्कीच आढळेल. कॅल्शियम कार्बाईडनेच आंबे पिकविले जातात हे खुद्द विक्रेतेच छातीठोकपणे सांगत असताना अन्न, औषधी प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त मिलींद देशपांडे यांना मात्र कुठेच कॅल्शियम कार्बाईड दिसत नाही. लोकमतने कॅल्शियम कार्बाईड वापराविषयी जागर करण्याचा प्रयत्न म्हणून एफडीएची भूमिका जाणून घेतली असता ‘तुम्हीच दाखवा कार्बाईड’, असा उफराटा सवाल मिलींद देशपांडे यांनी विचारला. हजारांवर फेरीवालेअमरावती शहरात आंबा पुरविणारे ३० घाऊक विक्रेते आहेत. बाजार समितीच्या आवारातील या विक्रेत्यांमार्फत स्थायी दुकानदार आणि फेरीवाले आंबे खरेदी करतात. बडनेरापासून रहाटगावपर्यंत आणि विद्युतनगरपासून तपोवनपर्यंत मग घराघरांत हे आंबे पोहोचतात. शनिवारी विविध फळविक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. परंतु कॅल्शियम कार्बाईड आम्हाला आढळून आले नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कार्बाईड दाखवा, आम्ही कारवाई करतो. - मिलिंद देशपांडेसहायक आयुक्त, अन्न अमरावतीलहानग्यांच्या पोटात कॅन्सरचे बीज !बंगळुरू, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून येणारे आंबे शहरात विकले जातात. आंब्यांचा टिकाऊपणा वाढावा यासाठी कच्चेच आंबे तोडले जातात. पूर्ण वाढ झालेले परंतु जराही मऊ न झालेले आंबे ट्रेमध्ये वा खोक्यात अनेक थर देऊन रचले जातात. थरांच्या मध्यभागी आणि खाली-वर कार्बाईडच्या साधारणत: ५० ग्रॅमच्या सहा पुड्या ठेवल्या जातात. तत्पूर्वी आंब्यांवर इथेलिन फवारले जाते. दोन ते तीन दिवसांत कच्चे आंबे पिवळे होऊ लागतात. आंब्यांचा बदलणारा हा रंग काहीसा वेगळा असतो. जाणत्यांना नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंब्यांची आणि कृत्रिमरित्या पिकविलेल्या आंब्यांची रंगांवरून नक्कीच पारख करता येते. घातक रसायनयुक्त हे आंबे शहरभर विक्रीसाठी उपलब्ध होतात. हट्टापायी नेले जाणारे आंबे चिमुकल्यांच्या शरीरात कॅन्सरचे बीजारोपण करीत आहेत, याची पुसटशीही कल्पना अनेक आई-वडिल, आजी-आजोबा, काका-मामांना नसते. सुनील देशमुख गप्प का?सर्वच लोकप्रतिनिधी या गंभीर मुद्यावर गप्प आहेत. एफडीएचे अधिकारी खिशात असल्याची भाषा आंबाविक्रेते सर्रास वापरतात. अधिकाऱ्यांची वागणूक आणि कार्यशैली या भाषेला पुरक ठरावी अशीच आहे. अमरावती महानगरीचे आमदार सुनील देशमुख हे स्वत: डॉक्टर आहेत. संवेदनशील नेतृत्त्व, अशी त्यांची ओळख आहे. प्रशासनावर पकडही आहे. लोकारोग्य धोक्यात घालणाऱ्यांना शासन मूकपणे बळ देत असेल तर सुनील देशमुखांनीही गप्प रहावे, हे जनसामान्यांना रूजणारे नाही.