वाळूज महानगर : मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची गळती थांबविली. त्यामुळे या ठिकाणाहून होत असलेल्या पाणी चोरीला लगाम बसलाआहे. सिडको जलकुंभाकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मागील काही दिवसांपासून रस्त्यालगत गळती सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. एकीकडे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरूअसताना दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत होती. ऐन टंचाईच्या काळात सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त लोकमतने २२ एप्रिल रोजी प्रकाशित करून या प्रश्नाला वाचा फोडली होती. लोकमतच्या वृृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने सोमवारी मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्त केली. जलवाहिनीची गळती बंद झाल्याने येथून पाणी चोरी करणाऱ्यांना पाणी घेणे अवघड झाले आहे. पाण्याची गळती थांबल्याने सिडको परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अधिकारी सुस्तपाणी गळतीमुळे सिडको परिसरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत होती. सदर जलवाहिनीवरून काही लोक पाण्याची चोरी करीत असत. विशेष म्हणजे येथून अधिकारी - कर्मचारी दररोज ये-जा करीत असतानाही या गळतीकडे कोणी लक्ष देत नव्हते. त्यामुळे सिडकोतील रहिवाशांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
सिडकोला जाग; पाणीचोरीला लगाम
By admin | Updated: April 27, 2016 00:31 IST