शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

शनिवारची सायंकाळ ख्रिसमस कार्निव्हलने रंगवली

By admin | Updated: December 22, 2014 00:07 IST

औरंगाबाद : नाताळचा सण आणि हिवाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व युनिव्हर्सल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ख्रिसमस कार्निव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

औरंगाबाद : नाताळचा सण आणि हिवाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व युनिव्हर्सल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ख्रिसमस कार्निव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात टीव्ही स्टार गिरीश जैन यांनी मुलांमध्ये त्यांच्यातीलच एक होऊन आनंद लुटला. यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.शनिवारी सायंकाळी कॅम्पस क्लबचे सदस्य असलेली मुले- मुली मोठ्या संख्येने जमली. क्वॉईन इन द रिंग, हूपला, कलरफुल मॅट्स, फीड द क्लाऊन, फुटबॉल टॉस, लक बाय चान्स, मार्बल अँड स्पून, लॉक अँड की, मिरर रायटिंग, मेक युवर ओन कप केक, मेक युवर ओन नेमप्लेट, आयपॉड प्ले, एम द नंबर्ड कॅन्स, नॉटिंग द मार्बल, बालिंग अ‍ॅली, पॉटर, लाख बँगल्स, कॅरी कॅचर, मेंदी, टॅटू, करा ओके, क्लिक युवर ओन पिक्चर, वी गेम्स, एक्स बॉक्स, असे कितीतरी मनोरंजक गेम शोजबरोबर थ्रीडी चित्रपटाचाही मनमुराद आनंद बच्चे कंपनीने घेतला.सोबतच जादूगारांनी जादूचे विलक्षण प्रयोग सादर करून कॅम्पस क्लब सदस्यांना चकित केले. शहरातील विविध नृत्य संचांनी ‘इंडियावाले’, ‘इश्कजादे’ व ‘मेरी किस्मत’ सारख्या लोकप्रिय गाण्यांवर दिलखेचक नृत्य सादर करून उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. ‘जय हो’ या गीतावर शाळेच्या वाद्यवृंद पथकाने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. या कार्यक्रमाचे संचालक आदित्य लोहना म्हणाले की, कृतीतून शिक्षण या उक्तीवर आमचा विश्वास असून ते रुजविण्याच्या दृष्टीनेच कार्यक्रम आयोजित केला गेला. उज्ज्वल शैक्षणिक भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने मनोरंजन, क्रीडा, साहस यातून शालेय शिक्षणाला हातभार कसा लागेल याचा विचार करूनच कार्यक्रम सादर केले गेले. त्यास मुला- मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विनय शर्मा व दिव्या यांनी या रंगतदार कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले.