शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘एन मार्ट’चा ९३ लाखाला चुना

By admin | Updated: May 4, 2016 00:05 IST

बीड : मल्टीचेन मार्केटिंग सिस्टीमच्या माध्यमातून साडेपाच हजार रुपये गुंतवा व महिन्याकाठी किराणा सामान व रोख रक्कम मिळवा

मोहाचा ‘माया’जाल : १७०७ सभासदांना टोपी घालून सुरतचे व्यापारी पसार; दहाजणांवर गुन्हा दाखलबीड : मल्टीचेन मार्केटिंग सिस्टीमच्या माध्यमातून साडेपाच हजार रुपये गुंतवा व महिन्याकाठी किराणा सामान व रोख रक्कम मिळवा, असे आकर्षित करणारे आमिष दाखवून सुरत येथील ‘एन मार्ट’ कंपनीने बीडमध्ये १७०० हून अधिक नागरिकांना सुमारे ९३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी कंपनीच्या चेअरमनसह ९ संचालकांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.२०१२ मध्ये शहर ठाण्याच्या समोर न्यू लूक रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या मल्टीस्टेट कंपनीने ‘एन मार्ट’ या नावाने शॉपिंग मॉल सुरु केला होता. या मॉलमध्ये सभासद होण्यासाठी साडेपाच हजार रुपयांचे शुल्क ठेवले होते. सभासद झाल्यानंतर चेन सिस्टीमने आणखी सभासद केल्यानंतर किराणा व रोख रकमेचे आकर्षक लाभ जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे व्यापारी, नोकरदार, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकही ‘एन मार्ट’च्या जाळ्यात अलगद ओढले गेले. दरम्यान, हा मॉल केवळ १४ महिने चालला. त्यानंतर ‘एन मार्ट’ ने गाशा गुंडाळला. या कंपनीचे मुख्य कार्यालय सुरतला असून, तांत्रिक अडचणींमुळे मॉल बंद केल्याची बतावणी सुरुवातीला झाली. मात्र चार वर्षांपासून मॉलचे शटर न उघडल्याने फसवणूक झाल्याचे सभासदांच्या लक्षात आले. त्यानंतर महासांगवी (ता. पाटोदा) येथील बापूराव बाबूराव राजगुरू या व्यापाऱ्याने शहर ठाण्यात धाव घेतली. पाठोपाठ बीडच्या एसटी महामंडळात चालक पदावर असलेल्या पराग प्रकाश कुलकर्णी व बीडमधीलच गृहिणी मंगल अतुल ठोकळ याही तक्रार घेऊन आल्या. पोलिसांनी शाहनिशा करुन या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. राजगुरू यांनी १००, कुलकर्णी यांनी ११०० व ठोकळ यांनी ५०७ सभासद केले होते. कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे सभासदांनी या तिघांना जाब विचारला, त्यामुळे त्यांनी ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. तिघांची तक्रार घेऊन पोलिसांनी बापूराव राजगुरू यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद केला. १७०७ सभासदांचे प्रत्येकी साडेपाच हजार रुपये याप्रमाणे ९३ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती शहर ठाण्याचे निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली.आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता‘एन मार्ट’ च्या मायाजालात शहरासह ग्रामीण भागातील अनेकजण अडकले होते. ‘जेवढे अधिक सभासद तेवढा अधिक फायदा’ हे गणित समोर ठेवून गोरगरिबांपासून ते धनदांडग्यांपर्यंत अनेकांनी यात पैसा गुंतवला होता. कंपनीने सभासदांची फसवणूक केल्यानंतर तक्रार देण्यासही आतापर्यंत कोणी पुढे आले नव्हते, मात्र राजगुरू, कुलकर्णी, ठोकळ यांनी धाडस केल्यामुळे आता तक्रारदार आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. अनेकांना गुंतवलेला पैसा परत मिळेल की नाही? याची चिंता लागली आहे.यांच्यावर गुन्हा दाखलन्यू लूक रिटेल प्रायव्हेट कंपनीच्या चेअरमनसह ९ संचालकांचा आरोपींत समावेश आहे. गोपाल मोहनसिंग शेखावत असे चेअरमनचे नाव आहे. अखिल पात्रावल, प्रतीक देसाई, हिरण देसाई, सलीम खान, डॉ. रियाज मुसीर, अल्फेक मुसीर, कमलेश शहा, प्रदीप गायकवाड, प्रशांत मोरे (सर्व रा. सुरत, गुजरात) हे आरोपी आहेत.पोलीस कर्मचारीही भुलले‘एन मार्ट’चा शॉपिंग मॉल शहर ठाण्याच्या समोरच होता. त्यामुळे शहर ठाण्यासह इतर पोलीसही मोहात अडकले. अनेक कर्मचाऱ्यांनी यात पैसा लावला होता. या भुलभुलैय्याला सुशिक्षितही बळी पडले. (प्रतिनिधी)‘मल्टीचेन सिस्टीम’ : तीन हजारांवर सभासदांना फसविल्याचा संशय‘एन मार्ट’ च्या नावाने बीडमध्ये अद्यावत शॉपिंग मॉल उभारलेल्या कंपनीने मल्टीचेन सिस्टीमद्वारे अल्पावधीत हजारो सभासद केले. तूर्त १७०७ सभासदांची ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असले तरी या कंपनीने ३ हजाराहून अधिक सभासद केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा पावणे दोन कोटींच्या घरात असल्याचे स्पष्ट होत आहे.साडेपाच हजार रुपये भरुन सभासदत्व मिळविणाऱ्यास दरमहा २२० रुपयांचे किराणा सामाना मॉलमध्ये मोफत दिले जात होते. त्यासाठी कूपन सिस्टीम लागू केली होती. शिवाय उधारीवर दीड हजार रुपयांपर्यंतचे सामान खरेदी करता येत होते. चार वर्षांनंतर कंपनीतर्फे सभासदांना प्रत्येकी ११ हजार रुपये दिले जाणार होते. मात्र कंपनीने अवघ्या १४ महिन्यात शटर बंद केले. या कंपनीच्या चेअरमनसह संचालकांकडे संपर्क केल्यानंतर त्यांचे भ्रमणध्वनीही बंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सभासदांपुढे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता.