शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या रस्त्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:39 IST

महाराष्टÑ शासनाने शहरातील प्रमुख रस्ते चांगले गुळगुळीत करावेत, या उद्देशाने महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील प्रमुख रस्ते चांगले गुळगुळीत करावेत, या उद्देशाने महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी महापौर बापू घडामोडे यांनी ५० रस्त्यांची यादी जाहीर केली. या यादीतील काही रस्ते अगोदरच चांगले आणि गुळगुळीत आहेत. त्यावर पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात येतोय हा सर्वात मोठा प्रश्न आहे.शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटीत ३० ते ३५ रस्त्यांची कामे होतील. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही १५० कोटींच्या ५० रस्त्यांची यादी जाहीर करण्यात आली. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर शहराला १०० कोटींचे अनुदान मिळाले. उर्वरित ५० कोटी रुपये मिळविण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील...? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करताना महापालिकेला वारंवार बजावले होते की, या निधीतून एकही अंतर्गत रस्ता करू नका. शहरातील मुख्य आणि खराब रस्तेच व्हाइट टॅपिंगने गुळगुळीत करा. मुख्यमंत्र्यांसमोर मनपा पदाधिकाºयांनी होकार भरला होता. जेव्हा रस्त्यांची निवड करण्याची वेळ आल्यावर २०१९ मधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात आले. काही ठिकाणी नगरसेवकांच्या समाधानासाठी रस्ते निवडण्यात आले. वास्तविक पाहता तेथे व्हाइट टॅपिंगची गरज आहे किंवा नाही, हा साधा निकषही पाळण्यात आलेला नाही.महापालिकेने अगोदरच कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य रस्ते डिफर पेमेंटवर तयार केले आहेत. या रस्त्यांचा फक्त सरफेस खराब झाला आहे. डांबराच्या एका थरानंतर रस्ता परत गुळगुळीत होऊ शकतो. त्यावर आता परत कोट्यवधींचा खर्च का...?फक्त सरफेस नसलेले रस्तेसिल्लेखाना चौक ते लक्ष्मण चावडी हा रस्ता डिफर पेमेंटवर तयार केला आहे. रस्त्याचा सरफेस वगळता त्याला काहीच झाले नाही. या रस्त्यावर ३ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मकबरा ते मकाई गेट रस्त्यावर २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आझाद चौक ते मनपा कार्यालय रस्त्यावर मागील वर्षीच मनपाने रोशनगेटपर्यंत सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले आहेत. शहागंज चमन ते निझामोद्दीन चौक, पीरबाजार ते जानकी हॉटेल, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, सेवायोजन कार्यालय ते बंधू चौक, जवाहरनगर पोलीस ठाणे ते सावरकर चौक, कामगार चौक ते खंडपीठ, पंचवटी ते कोकणवाडी, महाराष्टÑ डिस्टिलरी ते ब्ल्यू बेल्स रेसिडेन्सी, एन-१ पोलीस चौक ते प्रोझोन मॉल, अग्रसेन चौक ते एक्साइज कार्यालय, अमरप्रीत ते शहानूरमियाँ दर्गा, सिटीचौक ते पैठणगेट, उल्कानगरी ते खिंवसरा विहार या रस्त्यांचे फक्त सरफेस खराब झाले आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था अजिबात नाही.