शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली आलेला चिमुकला बचावला

By admin | Updated: July 9, 2017 00:41 IST

औरंगाबाद : ‘देव तारी त्याला कोण मारी...’ या म्हणीची प्रचीती आणणारी घटना शनिवारी (दि. ८) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहायला मिळाली,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘देव तारी त्याला कोण मारी...’ या म्हणीची प्रचीती आणणारी घटना शनिवारी (दि. ८) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहायला मिळाली, जेव्हा एक चिमुरडा रेल्वेखाली आला. रेल्वेखाली येऊनही चिमुरड्याचा जीव वाचल्याने कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला. दैव बलवत्तर होते म्हणून चिमुकल्याला काहीच झाले नाही; पण प्रत्यक्षदर्शी सर्वांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला होता. रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली आहे.रेल्वेस्टेशनवर शनिवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रवाना होताना ही घटना घडली. एक लहान मुलगा आणि मुलीसह आलेल्या दाम्पत्याने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. पुरुषाने आधी मुलीला उचलून धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात बसविले. त्यानंतर मुलाला बसविले. दोन्ही मुले आतमध्ये जात नाही, तोच महिलेने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत रेल्वेचा वेग वाढला होता. त्यामुळे तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडली. ही महिला प्लॅटफॉर्मवर पडत नाही, तोच दरवाज्यातून चिमुकलाही बाहेर फेकला गेला व प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये सापडला.हे भीषण दृश्य पाहून एकाच वेळी अनेकांच्या तोंडातून किंकाळ्या निघाल्या. या दुर्घटनेत मुलगा वाचेल, असे कुणालाही वाटले नसणार. रेल्वेस्टेशनवर एकच गोंधळ उडाला. अनेकांनी बोगीखाली सापडलेल्या चिमुकल्याकडे धाव घेतली; परंतु नशीब बलवत्तर म्हणून हा चिमुकला बालंबाल बचावला. प्रवाशांची सतर्कतागाडीच्या बाहेर फेकल्या गेलेल्या चिमुकल्यास एका प्रवाशाने घट्ट पकडून ठेवल्याने रेल्वेखाली येण्यापासून तो वाचला. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने रेल्वे तात्काळ थांबविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. चिमुकला बचावल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. घटनेनंतर ते पुढील प्रवासाला रवाना झाले. प्रवाशांनी धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेस्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांनी केले.