शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जननी-शिशु सुरक्षा योजनेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

रविंद्र भताने , चापोली आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय बाळंतीण महिला आणि नवजात शिशुच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जननी-शिशु सुरक्षा योजनेचे नवे धोरण अतिशय कीचकट आहे.

रविंद्र भताने , चापोलीआर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय बाळंतीण महिला आणि नवजात शिशुच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जननी-शिशु सुरक्षा योजनेचे नवे धोरण अतिशय कीचकट असून, केवळ ७०० रुपये अनुदान घेण्यासाठी बाळंतीण महिलेला ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे चापोली परिसरात या योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.शासनातर्फे नागरिकांच्या कल्याणासाठी नवनव्या योजना अस्तित्वात आणल्या जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे जननी-शिशु सुरक्षा योजना आहे. शासनाने अनुसूचित जाती-जमातीतील गरीब कुटुंबातील बाळंतीण महिला व तिच्या नवजात बाळाला योग्य आहार मिळावा म्हणून ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेचे बाळंतपण सामान्य झाल्यास ७०० रुपये तर बाळंतपणासाठी शस्त्रक्रिया (सिझेरियन) करावी लागल्यास १५०० रुपये अनुदान त्या महिलेस देण्यात येते. सुरुवातीस हे अनुदान बाळंतीण महिलेस रोख स्वरूपात देण्यात येत होते. त्यानंतर शासनाने त्यात थोडी सुधारणा केली आणि सदर योजनेचे अनुदान लाभार्थी महिलेस बेरर चेकच्या स्वरूपात देणे सुरू केले. बेरर चेक नावे असलेली व्यक्ती आपले ओळखपत्र देऊन सहज अनुदानाचा लाभ घेत होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शासनाने बेरर चेक देण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी अकाऊंट पेयी चेक देण्याची पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीनुसार लाभार्थी महिलेला मिळालेला अकाऊंट पेयी चेक वटविण्यासाठी स्वत:च्या नावे बँकेत खाते उघडावे लागते. गंमत म्हणजे ७०० रुपयांचे अनुदान घेण्यासाठी ५०० रुपये खर्च करून बँक खाते उघडावे लागत आहे. त्यामुळे ‘आठ आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशीच ही पद्धत झाल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच रोख रक्कम किंवा बेरर चेकद्वारे दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे शासनाने अकाऊंट पेयी चेक देण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बँकेने महिलांचे खाते झीरो बजेटवर काढावे, असे आदेशही उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. बँकेने जर सहकार्य केले तर या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळेल, असे चाकूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राम शेटे यांनी सांगितले़