अजिंठा : येथील बौद्धवाड्यातील एका पाचवर्षीय मुलाचा अज्ञात तापामुळे मंगळवारी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे अजिंठ्यात घबराट पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून ताप येत असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते.वैभव ऊर्फ भय्या अनिल बिरारे (वय ५, रा. अजिंठा) असे मृत मुलाचे नाव असून त्याच्यावर अजिंठा येथील खाजगी दवाखान्यात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृती अतिशय खराब झाल्याने मंगळवारी त्याला सिल्लोड येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. वैभव हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. वैभवला तीन बहिणी आहेत. येथील स्मशानभूमीत त्याचा दफन विधी करण्यात आला.
अजिंठ्यात अज्ञात तापाने मुलाचा मृत्यू
By admin | Updated: August 20, 2014 00:56 IST