शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी वसतिगृहांमध्ये मुलांचा छळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:08 IST

जिल्ह्यात सध्या सर्वत्र खासगी वसतिगृहांचे जाळे पसरले आहे. या वसतिगृहांमध्ये मुलांचा अमानुष छळ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात सध्या सर्वत्र खासगी वसतिगृहांचे जाळे पसरले आहे. या वसतिगृहांमध्ये मुलांचा अमानुष छळ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नसल्याने हजारो रूपये घेऊन दुकानदारी करणाºया वसतिगृह चालकांची ‘डेअरिंग’ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात तब्बल ३०० हून अधिक खासगी वसतिगृह असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुले व मुलींची अशी १३ शासकीय वसतिगृह आहेत. तर खासगी वसतिगृहांची संख्या शेकडोमध्ये असल्याचे समोर आले आहे. वसतिगृह उभारण्यासाठी असणाºया अटींची पूर्तता करण्यास खासगी वसतिृह उदासिन असल्याचे दिसते. मुलांना पाणी, स्वच्छता गृह, अभ्यासासाठी टेबल, झोपण्यासाठी गादी, स्वच्छ रूम, जेवण, शांत परिसर यासारखा काहीच सुविधा नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होतो. त्यांना कोंडवाडा असणाºया या वसतिगृहात राहण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे ते अनेकदा वसतिगृहातून पळून जातात. परंतु हे टाळण्यासाठी मुलांना दर्जेदार सुविधा आणि त्यांना मानसिक आधार देत शिस्त लावण्याची गरज आहे.वडवणीत वसतिगृह चालकाकडून मुलाला बेल्टने मारहाण; प्रकरण दडपले ?मुलांना शिस्त लावण्यासाठी थोडाफार मार देणे सहाजिक आहे. परंतु त्यांच्या अंगावरील सालटे जाईपर्यंत पट्टयाने मारहाण करणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा प्रकार वडवणी शहरातील एका खासगी होस्टेलमध्ये मंगळवारी उघडकीस आला आहे.४हे प्रकरणे हातापाया पडून मिटविण्यात यश आले असले तरी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याची मानसिकता खूप खचली आहे. या वसतिगृह चालकाने आपला गुन्हा कबूल केला असला तरी हा प्रकार माफिनाम्यासारखा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.४मुलाच्या पालकांचा हा वसतिगृह चालक नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेच नाही, असे सूत्रांनी सांगितले. वडवणी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले, याबाबत कसलीही तक्रार आलेली नाही. तक्रार येताच गुन्हा दाखल करून घेऊ.