शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा विमानतळाला ‘उडान’मधून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:53 IST

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचा फटका औरंगाबाद शहराला बसत आहे. एकीकडे मोठ्या विमान कंपन्यांकडे विमान उपलब्ध नाही. तर दुसरीकडे ‘उडान’ योजनेअभावी छोट्या विमानांद्वारे तासाभराच्या अंतरावरील शहरांबरोबरही हवाई कनेक्टिव्हिटी मिळत नाही. परिणामी नव्या विमानसेवा जमिनीवरच राहतआहे.केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी ‘उडान- उडे देश क ा आम नागरिक ’ ही योजना सुरू केली. यामध्ये अधिक विमानसेवा नसणा-या विमानतळांवरून एक तासाच्या आतील अंतरावरील शहरांसाठी २,५०० रुपयांत विमानसेवा देण्यास सुरुवात झाली.देशभरासह महाराष्ट्रातील नांदेड, शिर्डीसह इतर शहरांचा समावेश झाला.या योजनेमुळे बंद असलेली आणि नव्याने सुरू झालेली विमानतळे विमान कंपन्यांना खुणावत आहे. औरंगाबादपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शहरांतील विमानतळे गजबजू लागली आहेत. नांदेड, शिर्डी विमानतळावरून हे चित्र स्पष्ट होत आहे. ‘उडान’मध्ये काही केल्या औरंगाबाद विमानतळाचा समावेश होत नाही. त्यामुळे औरंगाबाद शहर नव्या शहरांबरोबर हवाई सेवेने जोडल्या जातनाही.ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू केली. परंतु त्यानंतर नव्या विमानसेवेची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवेने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई कनेक्टिव्हिटी आहे.कंपन्यांकडे सध्या मोठी विमाने उपलब्ध नाहीत. कंपन्यांना ही विमाने प्राप्त होताच औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू होईल, असे सांगितले जात आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘उडान’ योजनेत औरंगाबादचा समावेश करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होतआहे.औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर- उदयपूर- दिल्ली विमान, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबादसह बुद्धिस्ट सर्किटशी औरंगाबाद शहर विमानसेवेने जोडले जाण्याची प्रतीक्षा आहे.