शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती निर्बंध शिथिल करण्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतीलः एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:01 IST

Shiv Jayanti restrictions in Maharahstra यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत.

औरंगाबाद :  कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना नागरिकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यात बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे ओसरला नसल्याने राज्य सरकारने येत्या १९ फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिकेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवांद साधला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींंमधून संताप व्यक्त केला जात असून, हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी सुरू आहे. या संदर्भात राज्यशासन विचार करणार आहे का ? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात.

घरातच साधेपणाने साजरी करण्याची नियमावलीशिवजयंती गड-किल्ल्यांवर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे. ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती अद्यापही कायम आहे. हे लक्षात घेऊन गृह विभागाने ही नियमावली तयार केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEknath Shindeएकनाथ शिंदेShivjayantiशिवजयंती