शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण कामाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, वडीगोद्री रस्त्याचा प्रश्न कायम असून, याकडे मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर जालना-भोकरदन मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राखीव निधी आणला. या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. राजूर येथे जाताना भाविकांची गैरसोय होत असे. अनेकवर्षे मागणी करुनही हा प्रश्न सुटू शकलेला नव्हता. मात्र, खा. दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निधी खेचून आणला आणि या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्याला न्याय मिळाला तसाच तो जालना-वडीगोद्री मार्गासही मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेकवर्षांपासून या मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सहकार व शिक्षण महर्षी माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचे निधी झाल्याने टोपे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री याच मार्गाने पाथरवाला येथे गेले होते. तेव्हा या रस्त्याची अवस्था त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिने लक्ष घालावे आणि याचे चौपदरीकरणासाठी राज्याच्या तिजोरीतून आकस्मित निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन आर्थिक तरतूद झाली तर या मार्गाचे काम तात्त्काळ सुरू होऊ शकेल. अन्यथा अपघातांची मालिका सुरुच राहील आणि बळींची संख्या वाढतच राहील. जिल्ह्यातील एकमेव रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद विसरुन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)