शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्टा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जयपूरचा

By admin | Updated: June 5, 2016 00:44 IST

औरंगाबाद : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर चालविण्यात येणाऱ्या सट्ट्याचा अड्डा गत सप्ताहात गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्स येथे उद्ध्वस्त केला.

औरंगाबाद : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर चालविण्यात येणाऱ्या सट्ट्याचा अड्डा गत सप्ताहात गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्स येथे उद्ध्वस्त केला. सट्टा प्रकरणाचा स्थानिक सूत्रधार नरेश पोतलवाडसह दोन जण पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पोतलवाड यास लाईन देणारा मुख्य सूत्रधार राजस्थानमधील जयपूर येथील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई केली त्या दिवशी पोतलवाडच्या मिनी टेलिफोन एक्स्चेंजशी कनेक्ट असलेल्या ३८ मोबाईलपैकी ३१ बुकींची नावे आणि पत्ते मोबाईल कंपन्यांकडून मागविले आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील विविध सामन्यांवर शहरात आॅनलाईन सट्ट्याचा अड्डा २९ मे रोजी रात्री गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करून उद्ध्वस्त केला होता. गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्स येथील एका फ्लॅटमध्ये गुपचूप हा अड्डा आरोपी नरेश पोतलवाड याने सुरू केला होता. पोतलवाडला गतवर्षीही उस्मानपुरा परिसरात सट्टा खेळविताना पकडण्यात आले होते. २९ मे रोजी रात्री पोलिसांनी छापा मारून अजित आगळे ऊर्फ छोटू आणि प्रकाश ठोले यांना अटक केली होती. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी पोतलवाडच्या मिनी टेलिफोन एक्स्चेंजसोबत ३८ बुकी आॅनलाईन होते. त्यांचे वेगवेगळे मोबाईल सीमकार्डसह जोडण्यात आलेले होते. पोलिसांनी हे मोबाईल जप्त केलेले आहेत. त्यातील सीमकार्डच्या आधारे संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्र पाठवून सीमकार्ड कोणाच्या नावे आहे.शिवाय सीमकार्ड घेताना त्यांनी दिलेली कागदपत्रे मागविली आहेत. प्राथमिक चौकशीत ३८ पैकी ७ मोबाईल हे एकट्या पोतलवाडच्या नावे असल्याचे समोर आले आहे. उर्वरित ३१ मोबाईल हे यवतमाळ, पुसद, धर्माबाद, नांदेड आणि विदर्भातील अन्य गावांतील बुकींची आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी विविध मोबाईल कंपन्यांना पत्र पाठवून ३१ आरोपींनी सीमकार्ड खरेदी करताना कंपनीला दिलेले आधार कार्ड, मतदान कार्डसह त्यांची नावे आणि पत्त्याची माहिती मागविली आहे. पोतलवाड तोंड उघडेनाआरोपी पोतलवाड हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून आयपीएल सट्ट्याचा प्रमुख हा जयपूर (राजस्थान) येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो तोंड उघडत नसल्याने जयपूर येथील आरोपीचे नाव आणि पत्ता सहा दिवसांनंतरही पोलिसांना मिळाला नाही.