शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छावा कार्यकर्त्यांची दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:29 IST

५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणाºया राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकर्ते पळून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणाºया राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकर्ते पळून गेले.मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजाने राज्यात तब्बल ५९ मोर्चे काढले. ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा मराठा क्रांती मोर्चाने काढला. प्रत्येक मोर्चाच्या प्रसंगी शासनाला निवेदन दिले आणि शासनाने मागण्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. शासनाने मराठा समाजाला केवळ गृहीत धरले. समाजाच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. याबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नागपूर येथे अधिवेशनस्थळी गेले होते. त्यावेळी शासनाच्या आदेशाने पोलिसांनी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटक केली. शासनाची ही दादागिरी असल्याचे नमूद करून छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी अक्कलकोट ते चाळीसगाव या एस. टी. बसवर दगडफेक के ली. ही बस सिडको बसस्थानक येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात होती. उच्च न्यायालयासमोरील पुलाजवळ बस असताना आंदोलनकर्त्यांनी बस अडविली. यावेळी एस. टी. बसचालक विजय त्रिंबक अहिरराव यांनी बस थांबविताच आमचे हे आंदोलन असून, तुम्ही बसच्या खाली उतरा, असे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. विशेष शाखेचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण हे जळगाव रोडवर असताना या आंदोलनाची त्यांना माहिती मिळाली. ते लगेच एमजीएममार्गे जालना रोडवर आले. यावेळी पोलीस आल्याचे दिसताच आंदोलनकर्ते कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाले. एका पोलीस अधिकाºयाने प्रसंगावधान राखून धाव घेतल्याने अन्य वाहनांचे होणारे नुकसान टळले.