शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रसायन खरेदीत घोळ !

By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा विभागासाठी मागील दोन वर्षांत रसायन खरेदी केल्यामुळे त्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी सुरू केला आहे

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा विभागासाठी मागील दोन वर्षांत रसायन खरेदी केल्यामुळे त्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी सुरू केला आहे. ११ आॅगस्टच्या सभेसमोर रसायन खरेदीला कार्याेत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेंतर्गत फारोळा येथे ५६ व १०० द.ल.लि. जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. दोन्ही शुद्धीकरण केंद्रात दररोज सरासरी १४५ ते १५० द.ल.लि. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत पाण्याचा गढूळपणा नष्ट करणे, पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. यावेळी तुरटी ग्रेड-१, पॉली अ‍ॅल्युमिनियम क्लोराईड (पीएसी) पावडर, ब्लिचिंग पावडर ग्रेड-१ व क्लोरिन या रसायनांचा वापर केला जातो. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात १६० टन पीएसी पावडर खरेदीला मान्यता देण्यात आली. सुमारे ५० लाख रुपयांची ती पावडर होती. त्याच काळात १८ लाख रुपयांची तुरटी खरेदी करण्यात आली. २०११-१३ या काळात ते रसायन खरेदी करण्यात आले आहे. नगरसेवक म्हणाले....शिवसेना नगरसेवक राजू वैद्य म्हणाले, पालिका प्रशासनाची ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. जे घटक नियमित लागणारे आहेत, ते लपून-छपून खरेदी करण्याची काहीही गरज नाही. यामध्ये गौडबंगाल असल्याचा संशय येतो आहे.