हिंगोली : जिल्ह्यातील गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी नियमित तपासणी करण्याबरोबरच सर्व सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीएनडीटी अंतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी सीईओ पी.व्ही. बनसोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंत बोरसे, वैैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश टेहरे, डॉ. बडे, तहसीलदरा विद्याचरण कडवकर, अॅड. ढवळे, उगम संस्थचे अध्यक्ष जयाजी पाईकराव आदी उपस्थित होते. बैैठकीत जिल्हाधीकारी कासार म्हणाले अवैैधरित्या गर्भलिंग केंद्रांची माहिती मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांक सर्वत्र लावले पाहिजे. लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टर्स व रूग्णालयाची माहिती देण्यासाठी पारितोषिक दिले जाणार असल्याबाबत जागृती करावी, अशा सूचना कासार यांनी आरोग्य विभागास दिल्या. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील मुलगा व मुलींच्या नोंदी घेऊन मुलांच्या जन्माचे प्रमाण असणाऱ्या तालुक्यात पीसीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात नोंदणीकृत २५ पैैकी ११ सेंटर कार्यान्वित असून १९ एमटीपी सेंटर्सपैैकी १३ कार्यान्वीत असल्याचा महिती बोरसे यांना दिली. २०१०-११ मध्ये १००० मागे ८६८ स्त्रीयांचे प्रमाण सध्या ९३८ वर गेल्याचे बोरसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)टोल फ्री क्रमांकयाबाबतच्या तक्रारीसाठी १८००२३३४४७५ क्रमांकावर संपर्क करावा, अशी माहिती देणाऱ्याची नावे उघड न करता त्यांना २५ हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
‘सोनोग्राफी सेंटर्स तपासा’
By admin | Updated: September 6, 2014 00:26 IST