शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

लॉन्सच्या पार्किंगची कागदपत्रे तपासा

By admin | Updated: July 7, 2017 01:15 IST

औरंगाबाद :रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या लॉन्स, मंगल कार्यालयांची कागदपत्रे तपासून दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करा, अशा सूचना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनता-पोलीस संवाद कार्यक्रमात दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा, देवळाई, बीड बायपास रोडवर लॉन्स व मंगल कार्यालयांची संख्या अधिक आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या लॉन्स, मंगल कार्यालयांची कागदपत्रे तपासून दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करा, अशा सूचना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनता-पोलीस संवाद कार्यक्रमात दिल्या. पैठण रोड महानुभाव आश्रम पोलीस चौकी ते बीड बायपास देवळाई चौक व झाल्टा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा विविध लॉन्स आहेत. किमान १५ च्या जवळपास ही संख्या पोहोचली आहे. लग्नसराईत रस्त्यावर वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. अशा प्रसंगी दवाखान्यात रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलादेखील अनेकदा रस्ता मोकळा करून दिला जात नाही; परंतु लॉन्स अथवा मंगल कार्यालयांत वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असतानाही बायपासवरच वाहनांची अवैध पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. सातारा- देवळाईत लाखाच्या जवळपास लोकसंख्या असून, कामावर ये-जा करणे कठीण झाले आहे. मंगल कार्यालयांनी स्वत:ची स्वतंत्र पार्किंग करून धोका टाळावा, अशी मागणी जनता दरबारात केली होती. त्यानुसार पोेलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनतेला होत असलेल्या अडचणी टाळण्यासाठी लॉन्स व मंगल कार्यालयांचा सर्व्हे करून त्यांची रीतसर लॉन्स, पार्किंगची जागा तपासा तसेच वाहतुकीला अडथळा ठरत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक भारत काकडे यांना दिल्या आहेत. विचारमंचावर पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांची उपस्थिती होती.