शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

बीड : जिल्हा परिषदेत गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत अपंग कर्मचारी प्रमाणपत्रांच्या तपासणीचा ठराव संमत करण्यात आला.

बीड : जिल्हा परिषदेत गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत अपंग कर्मचारी प्रमाणपत्रांच्या तपासणीचा ठराव संमत करण्यात आला. दलित वस्ती विकास योजनेच्या निधीवाटपासह दुष्काळी उपायांच्या अनुषंगाने चर्चा झाली.अध्यक्ष विजयसिंह पंडित, उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, कमल मुंडे, महेेंद्र गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. सीईओ नामदेव ननावरे, प्रभारी अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांची उपस्थिती होती. बैठकीत शिक्षण, समाजकल्याण, पाणीपुरवठा, आरोग्य या विभागांच्या अनुषंगाने चर्चा झाली.सदस्या काशीबाई गवते यांनी अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे ग्रामसेवक, शिक्षकपदी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा छडा लावण्याची मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष पंडित यांनी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. सभापती महेंद्र गर्जे, बजरंग सोनवणे यांची समिती प्रमाणपत्रांची तपासणी करणार आहे. सन २००० पासूनच्या अपंग कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. अपंग कोट्यातून नोकरी मिळविणाऱ्यांना व बदली होऊन आलेल्यांना त्यामुळे दणका बसणार आहे. तपासणी अहवाल पुढील बैठकीसमोर ठेवण्यात येणार आहे. यावेळी समाजकल्याणच्या दलित वस्ती विकास योजनेच्या रखडलेल्या निधीवरही चर्चा झाली. दोन टप्प्यांत मिळून अडीच कोटी रुपये उपलब्ध करण्याचा निर्णय झाला. गटनेते मदनराव चव्हाण, दशरथ वनवे यांनी दुष्काळाचे मुद्दे मांडले. उपाययोजना सुरु असल्याचे अध्यक्ष पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गवते यांनीच विस्तार अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या बदल्या करताना आयुक्तांची परवानगी घेणे अपेक्षित होते;परंतु तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांच्या आदेशानेच बदल्या झाल्या होत्या. सभापती बजरंग सोनवणे यांनी पाच विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्दचा निर्णय घेतला. भीमराव नांदूरकर, जी.एन. चोपडे, मधूकर तोडकर, ऋषीकेश शेळके, तुकाराम जाधव यांचा समावेश आहे. नियमबाह्य बदल्या कोणी केल्या? याची चौकशी करुन त्या स्वीकारणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सोनवणे म्हणाले.