शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:55 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. एफआरपी प्रकरणात येत्या अधिवेशनात दाखल केलेल्या लक्षवेधीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे चर्चा होऊ देणार नाहीत, कारण ते अध्यक्ष असलेल्या कारखान्याकडूनही शेतक-यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.राज्य शासनाने उसाला प्रति टन २५५० रुपये हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात हमीभावातून औरंगाबाद जिल्ह्यात ४३४ रुपये तोडणी व वाहतूक खर्च कपात केला जाणार आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती २११६ रुपये (पान २ वर)बागडेंकडून शेतक-यांची पिळवणूकविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्याकडून शेतकºयांची पिळवणूक होत असून, ते शेतकºयांचे हित पाहत नाहीत, असा आरोप आ. जाधव यांनी केला. मी अधिवेशनात मांडलेली लक्षवेधी लावून शेतकºयांच्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढावा. एफआरपी म्हणजे २५५० रुपये थेट शेतकºयांच्या हाती पडले पाहिजेत, तोडणी व वाहतुकीचा खर्च त्यातून कपात करू नये, अशी मागणी जाधव यांनी केली.जाधव यांनी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावेआ. जाधव यांनी आरोप करण्यापूर्वी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावे. शेतकºयांना जास्तीचा भाव दिलेला आहे. २५५० चे सूत्र असून त्यातून वाहतूक, तोड वजा करण्यात येईल. फील्डवर काम करणाºयाचे वेतनही त्यातच धरावे असे त्या सूत्रात नमूद आहे. एफआरपीचा भाव ९.५ टक्के वसुलीला आहे. ७.५ टक्के वसुली आहे. सध्या २० किलो साखर प्रतिटनामागे कमी उत्पादित होत आहे, असे प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना दिले.