औरंगाबाद : फसवणुकीसाठी ठग कधी काय फंडा वापरतील, याचा नेमच नाही. अशाच एका ठगाने बेरोजगारांना गंडविण्यासाठी चक्क एसटी बसचाच वापर केला. नोकरीचे आमिष दाखवून त्याने शेकडो बेरोजगारांकडून हजारो रुपये उकळले. नोकरीसाठीची कागदपत्रे अन् सोबत सहाशे रुपये फीस, असे हे पार्सल तो औरंगाबादेत येणाऱ्या एसटीत टाकायला सांगायचा अन् येथे ते कलेक्ट करून गायब व्हायचा...शेख अजीम शेख रफीक (२५, रा. जयुनुद्दीन कॉलनी, सिल्लोड) असे या ठगाचे नाव असून त्याला मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी हर्सूल टी पॉइंट येथे हे भोकरदन- औरंगाबाद बसमधून असे पार्सल घेताना रंगेहाथ अटक केली. घटनेबाबत माहिती पोलिसांनी सांगितली की, भोकरदन तालुक्यातील संगीता कृषी सेवा केंद्राचे चालक खरात मामा यांना काही दिवसांपूर्वी एका जणाने फोन केला व ‘मी समृद्धी बायोटेक कंपनीतून कृषी अधिकारी पवार बोलतोय, कंपनीत दोन जागा भरायच्या आहेत. दहा- बारा हजार रुपये वेतन देण्यात येईल, शिवाय पेट्रोल, मोबाईलभत्ताही मिळेल. गरजवंत मुले असतील तर त्यांना माझा नंबर द्या’ असे फोन करणाऱ्याने सांगितले. तेव्हा खरात यांनी ओळखीतील नोकरीच्या शोधात असलेल्या योगेश नाना राऊत (रा. सोयगाव देवी, भोकरदन, जालना) याला ‘त्या’ पवार साहेबांना फोन करायला सांगितले. त्यानुसार योगेशने संपर्क साधला. तेव्हा पवार नावाच्या त्या व्यक्तीने ‘नोकरीसाठी तुमचे तीन फोटो, शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स आणि सहाशे रुपये रोख एका पाकिटात टाकून ते पाकीट औरंगाबादला (पान २ वर)बंटी अन् बबलीही!नोकरीचे आमिष दाखवून प्रत्येक तरुणाकडून सहाशे रुपये उकळण्याच्या या धंद्यात आरोपी शेख अजीमबरोबरच त्याची पत्नी रेशमा शेखही सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. एखाद्या बेरोजगाराने कागदपत्र आणि पैशांचे पार्सल पाठविल्यानंतर फोन केला की, अजीमची पत्नी फोन उचलायची आणि ‘साहेब आता बिझी आहेत. नंतर फोन करा’ असे म्हणून ती टाळाटाळ करीत होती. या प्रकरणी पोलिसांनी या बंटी- बबलीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून अजीमला अटक केली असल्याचे फौजदार बिरारे यांनी सांगितले. तरुणांच्या कागदपत्रावर घ्यायचा बोगस सीमकार्डधक्कादायक बाब म्हणजे आरोपी शेख अजीम हा मुलांकडून नोकरीसाठी जी कागदपत्रे मागवायचा, त्याच कागदपत्रांच्या आधारे तो बोगस नावाने सीमकार्ड खरेदी करायचा. मग दर पाच-सहा दिवसांआड एक नवीन सीमकार्ड खरेदी करून जुने फेकून देई. या कार्डचाच वापर फसवणूक करण्यासाठी करीत होता, असेही समोर आले आहे.
फसवणुकीचे पार्सल थेट ‘लॉकअप’मध्ये
By admin | Updated: July 6, 2016 23:57 IST