मीनाबाई भगवान व्यवहारे यांच्या नावावर स्वस्त धान्याचे दुकान आहे. मीनाबाई व्यवहारे या आजारी असल्यामुळे त्यांचे पती भगवान व्यवहारे हे दुकानाचे काम पाहतात. कार्डधारकांना तीन दिवसात (दि. २३, २४, २५) माल वाटप करण्यात येणार होता. परंतु या दरम्यान ई-पॉज मशीनची अडचण आली. त्यामुळे संबंधित कार्डधारकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. परंतु ते परत जाताना भगवान व्यवहारे यांच्यावर त्यांनी माल देत नसल्याचा आरोप केला. तांत्रिक अडचणीमुळे प्रत्येक वेळी जनतेला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भगवान व्यवहारे यांनी वैतागून पुरवठा विभागाकडे दुकानाची चावी, ई-पॉज मशीन देण्याचा निर्णय घेतला. अचानकपणे त्यांनी असा का निर्णय घेतला. त्या मागे केवळ जनतेचा त्रास हे एवढेच कारण आहे का, पुरवठा विभागातील काही अधिकारीदेखील दुकानदारांना त्रास देत आहेत, अशी चर्चा दिवसभर तहसील कार्यालयात रंगली होती. यासंदर्भात तहसीलदार राहुल गायकवाड यांना विचारले असता. ते म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदार मालकाची चावी, ई-पॉज मशीन दुकानदाराला जमा करण्याची कुठल्याही प्रकारची तरतूद नाही. याविषयी नायब तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
ई-पॉज मशीन घेऊन स्वस्त धान्य दुकानदारच तहसील कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST