शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

चव्हाण दाम्पत्यास पोलिसांचा ‘पाहुणचार....!’

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

औरंगाबाद : केबीसी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार तथा कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांना जवाहरनगर पोलिसांनी नाशिक कारागृहातून अटक करून आणले

औरंगाबाद : केबीसी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार तथा कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांना जवाहरनगर पोलिसांनी नाशिक कारागृहातून अटक करून आणले आहे. चव्हाण दाम्पत्याने औरंगाबादसह राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी २०१४ मध्ये गुन्हे दाखल झाले होते. जवाहरनगर पोलीस ठाण्यात भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, दादासाहेब चव्हाण, किशोर जोशी, संदीप जगदाळे हे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते. केबीसी कंपनीने एप्रिल २०११ मध्ये जालना रोडवरील अतिथी हॉल येथे एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी केबीसीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, मराठवाडा व्यवस्थापक दादासाहेब पोटे यांनी १७ हजार २०० रुपये गुंतवणूक केल्यास तीन वर्षांनंतर १ लाख ३ हजार ५०० रुपये मिळतील, असे आमिष दाखविले होते. या मेळाव्यास शिवाजीनगर येथील रहिवासी सुभाष पाडळे, बाबासाहेब कंधारकर (रा.कुंभेफळ) यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार उपस्थित होते. कंपनीचे मराठवाडा कार्यालय शिवाजीनगर येथे होते. तेथे पोटे यांच्याकडे गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमा जमा केल्या होत्या. कंधारकर यांनी एकूण २ लाख ३३ हजार ४०० रुपये गुंतवणूक केली होती. त्यानुसार कंपनीकडून ११ आॅगस्ट २०१४ रोजी परतावा मिळणार होता. मात्र, त्यांना ही रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीचा फोन बंद होता. त्यामुळे ते नाशिक येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात गेले तेव्हा त्यांच्यासारख्या अनेकांकडून केबीसीने कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजले.