शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या फौजदाराला धक्काबुक्की

By admin | Updated: June 8, 2017 00:33 IST

बीड : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यासाठी गेलेल्या शिवाजीनगरच्या फौजदाराला (पीएसआय) आरोपीचा नातेवाईक असलेल्या हवालदाराने धक्काबुक्की केली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यासाठी गेलेल्या शिवाजीनगरच्या फौजदाराला (पीएसआय) आरोपीचा नातेवाईक असलेल्या हवालदाराने धक्काबुक्की केली. ही घटना बीड शहरातील बार्शी रोडवर मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी हवालदारासह १२ जणांविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास औसरमल असे त्या हवालदाराचे नाव आहे. औसरमल हे शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. अंबादास औसरमल यांचा भाऊ जालिंदर औसरमल व पुतण्या योगेश औसरमल हे दोघे बाप-लेक बलात्कार प्रकरणातील आरोपी आहेत. हे दोघे सध्या पुणे येथे वास्तव्यास असून बीड येथील एका लग्नासाठी शहरातील एका मंगल कार्यालयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बीड शहर ठाण्याचे फौजदार कैलास बेले हे मंगळवारी सायंकाळी मंगल कार्यालयात आरोपींना अटक करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना अंबादास औसरमल यांनी बेले यांना प्रतिबंध केला. तसेच त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचे बेले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी बेले यांना संबंधित हवालदाराविरूद्ध तक्रार देण्याचे आदेशित केले. त्यानुसार बेले यांनी शिवाजीनगर ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दिली. त्यावरून हवालदार अंबादास औसरमल, जालिंदर औसरमल यांच्यासह १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि भूषण सोनार करीत आहेत.