शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार्ली फोडणार वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:15 IST

औरंगाबाद : बीड बायपास, जालना रोड आणि लिंक रोडवर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचे विशेष चार्ली पथक स्थापन करण्यात आले

औरंगाबाद : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीकडे पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याचे ठरविले असून बीड बायपास, जालना रोड आणि लिंक रोडवर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचे विशेष चार्ली पथक स्थापन करण्यात आले आहे. या तीन मार्गांवर हे पथक सतत गस्त घालून पोलिसांच्या मदतीने वाहतुकीच्या समस्या सोडविणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत अनेक पर्याय शोधले; परंतु पाहिजे तसा फायदा अजून झालेला नाही. बाबा पेट्रोल पंप, क्रांतीचौक, हॉटेल अमरप्रीत चौक, आकाशवाणी, सेव्हन हिल, अग्रसेन चौक, सिडको चौक, एपीआय कॉर्नर, महानुभाव आश्रम चौक, नगर नाका, लिंक रोड चौक, देवळाई चौक, संग्रामनगर उड्डाणपूल चौक इ. ठिकाणी वाहनांच्या सतत रांगा लागलेल्या असतात. शहरात लग्नाची वरात किंवा अन्य काही कारणांमुळे वाहतूक खोळंबल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यानंतर वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस कर्मचारी जाईपर्यंत अनेकदा काही तरी विपरीतच घडलेले पोलिसांना पाहावयास मिळते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत जाते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन विशेष फिरती चार्ली पथके स्थापन केली आहेत. त्यांना दिलेल्या मार्गावरून ते सातत्याने गस्त घालून कोंडी होऊ देणार नाहीत आणि कोंडी निर्माण झालीच तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.