शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रभारींवर चालतोय मनपाचा कारभार !

By admin | Updated: July 18, 2016 01:09 IST

लातूर : लातर महानगर पालिकेतील रिक्त असलेल्या जागेवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यामुळे सध्या मनपातील कारभार प्रभारींवरच हाकला जात आहे.

लातूर : लातर महानगर पालिकेतील रिक्त असलेल्या जागेवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यामुळे सध्या मनपातील कारभार प्रभारींवरच हाकला जात आहे. विशेष म्हणजे महत्वाच्या अधिकाऱ्यांची पदेही सध्या रिक्त आहेत. याठिकाणी वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रिक्त पदांवर मनपा ‘प्रभारी राज’ सुरु आहे. लातूर महानगर पालिका अस्तित्वात आल्यानंतर महत्वाच्या पदासाठी राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता यातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यामुळे ही महत्वाची पदे रिक्त आहेत.या पदांचा पदभार मनपातील वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. प्रभारी पदावर मनपाचा पदभार हाकला जात असून, एका कर्मचाऱ्याकडे किमान तीन विभागाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे प्रशासनातील गोंधळ वाढला आहे. नगर अभियंतापद महत्वाचे असताना टंचाई काळातच हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून हे पद न भरल्यामुळे टंचाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. सहाय्यक आयुक्तांची एकूण ६ पदे मंजूर असून एका सहआयुक्तावर कारभार सुरु आहे. उपायुक्त यांचे दोन पदे मंजूर असताना एकच अधिकारी आहे़ नगर अभियंता, विद्युत विभाग प्रमुख हे प्रभारीच आहेत. तर प्रभाग अधिकारी यांची ६ पदे मंजूर असतानाही एकाच अधिकाऱ्यावर कारभार चालविला जात आहे. शहराच्या विकासासाठी महत्वाचे असणारे मनापातील नगर रचनाकार पदच सध्याला रिक्त आहे. रिक्त पदांचा आकडा मोठा असून, केवळ सोय म्हणून मनपातील वर्ग-३ च्या प्रभारी कर्मचाऱ्यांकडे देत दिवस काढण्याचा प्रकार मनापाकडून सुुरु आहे. (प्रतिनिधी)लातूर शहरातील पाच लाख लोकांचे आरोग्य सांभाळणाऱ्या महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणाच सध्याला ‘सलाईन’वर असल्याने ढेपाळली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरुपी आरोग्य अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली नसल्याने, या पदावर कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यांवरच मनपाकडून शहराचे आरोग्य सांभाळण्याची कसरत सुरु आहे. लातूर शहरातील नागरिकांना टंचाई काळात पाणीपुरवठ्यासाठी लागणारे कर्मचारीही इतर विभागाकडून मनापाने घेतले आहेत. सध्याला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाचे एकूण ४५ कर्मचारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. यामध्ये १० अभियंता आणि ३५ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. लातूर शहर महानगर पालिकेसाठी एकूण १ हजार २७४ पदे मंजूर असून, यातील ८८७ कर्मचारी मनपाकडे अस्थापनेवर कार्यरत असल्याची माहिती, आस्थापना विभागाचे रमाकांत पिडगे यांनी सांगितले.