शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

गोंदी पोलिस ठाण्याचा कारभार महिनाभरापासून प्रभारी

By admin | Updated: November 25, 2015 23:16 IST

राजू छल्लारे , वडीगोद्री अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण ७५ गावे आणि २८ वाड्यांचा विस्तीर्ण कार्यभार असलेल्या गोंदी पोलिस ठाण्याचा पदभार मागील महिनाभरापासून

राजू छल्लारे , वडीगोद्रीअंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण ७५ गावे आणि २८ वाड्यांचा विस्तीर्ण कार्यभार असलेल्या गोंदी पोलिस ठाण्याचा पदभार मागील महिनाभरापासून घनसावंगी पोलिस ठाण्याचा प्रभारीपदभार असलेले सपोनि बांगर यांच्याकडे देण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याकडे दोन ठाण्यांचा प्रभारी पदभार देण्यात आल्याने तपास कामावर परिणाम होत आहे.गोंदी पोलिस ठाण्यातंर्गत दुनगाव ते मंगरूळ सुमारे ९० कि़ मी. अंतरावरील गोदाकाठची अंबड व घनसावंगी तालुक्यातील ७५ गावे आणि २८ वाड्यांचा कार्यभार आहे. या ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्याकडे आहे. मात्र मागील महिनाभरापासून ते आजारी रजेवर आहेत. ते अद्याप रूजू झालेले नाहीत. या ठाण्याचा कार्यभार घनसावंगी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्याकडे आहे. त्यामुळे बांगर यांच्याकडे घनसावंगी पोलिस ठाण्यातंर्गत असलेली १०३ गावे आणि गोंदी ठाण्यातील १०३ अशा २०६ गावांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.गोंदी पोलिस ठाण्याचा विस्तीर्ण कार्यभार असताना तसेच या ठाण्यातंर्गत दोन राष्ट्रीय महामार्ग आहे. यामार्गावर अपघात तसेच लुटमार, चोऱ्या आदी गुन्हेही वाढलेले आहेत. जिल्हा पोलिस दलाने या ठाण्याचा कार्यभार पोलिस निरीक्षकांकडे दिलेला नाही. ठाण्याला मागील काही वर्षांपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकारीच आहे. त्यामुळे ठाण्याला पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात यावा, पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी. अशी मागणी होत आहे.