शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘प्रभारीं’चे ग्रहण

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

कळंब : ९१ गावचा कारभार हाकणाऱ्या कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला वर्षभरापासून प्रभारीचे ग्रहण लागले आहे़

कळंब : ९१ गावचा कारभार हाकणाऱ्या कळंब पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला वर्षभरापासून प्रभारीचे ग्रहण लागले आहे़ वर्षभरात तब्बल पाच बीडीओंनी काही काळासाठी कारभार हाती घेतला़ त्यामुळे विविध गावातील अनेक योजनांची कामे रखडली असून, सर्वसामान्यांची हेळसांड होत आहे़ तालुकास्तरावर महत्त्वपूर्ण असलेले पद कायमस्वरूपी भरण्यासाठी मात्र तालुक्यातील राजकीय नेतेमंडळींसह वरिष्ठांनी मात्र साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरातील दुवा म्हणून पंचायत सिमती तालुकास्तरावर काम करते़ जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत विविध योजनांवर संनियंत्रण ठेवून सक्षमपणे योजनांची अंमलबजावणीत पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची असते़ शिवाय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख करण्यापासून नागरिकांना वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवून देणे, निधी वितरित करणे, तांत्रिक व प्रशासकीय देखभाल करणे आदी कामे पंचायत समितीकडून केली जातात़ एप्रिलपासून पद रिक्तकळंब पंचायत समितीत मार्च २०१३ मध्ये गटविकास अधिकारी म्हणून प्रमोद काळे कार्यरत होते़ त्यांनी एप्रिलमध्ये वैद्यकीय रजा दिली़ त्यानंतर त्यांनी कळंबला परत रुजू होण्याऐवजी बदली करून घेण्यासाठी खटाटोप सुरू केली़ अखेर त्यांची करमाळा येथे बदली झाली़ त्यामुळे एप्रिलपासून पंचायत समितीला कायम गटविकास अधिकारी लाभलाच नाही़ वर्षभरापासून येथील पद रिक्त असून, इतरत्र ग्रामविकास विभागाकडून बदलीचा आदेश निघाला तरी कळंब पंचायत समितीला मात्र एकही कायम अधिकारी मिळाला नाही़ (वार्ताहर)वर्षभरात झाले पाच प्रभारीकळंब पंचायत समितीत वर्षभरात पाच प्रभारी अधिकाऱ्यांनी कामकाज चालवले आहे़ प्रमोद काळे यांच्यानंतर उस्मानाबाद येथील महाग्रारोहयोचे गटविकास अधिकारी परमेश्वर माने यांनी प्रभारी कामकाम हाती घेतले़ त्यांनी कामाला गती आणली न् आणली तोच त्यांनी आपल्या मूळ गावी जाणे पसंत केले़ त्यानंतर लोहारा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बी़आऱढवळशंख यांच्या हाती कामकाज सोपविण्यात आले़ त्यांनीही दोन महिन्यातच कामकाज आटोपले़ तद्नंतर भूमचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक माहोर यांनी कार्यभार स्वीकारला़ मात्र, त्यांचे अकाली निधन झाले़ यामुळे पुन्हा गटविकास अधिकारी पदाचा प्रश्न निर्माण झाला़ मार्च अखेर उमरगा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी आऱयु़चाकोर यांच्याकडे कळंब येथील पदभार देण्यात आला़ त्यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून तुळजापूरला आदेश निघाल्याने आता कळंबचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी श्री यमपुरे हे काम पाहत आहेत़ अशा प्रकारे रिक्त असलेल्या पदावर पाच प्रभारी अधिकाऱ्यांनी काम केले आहे़नियुक्तीकडे सर्वांचेच दुर्लक्षपंचायत समितीतील सभापतीपद शिवसेनेकडे असून, उपसभापतीपद काँग्रेसकडे आहे़ तर विरोधी गटात राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत़ एकूणच कळंब पंचायत समितीवर राजकीय प्राबल्य असून, सत्ताधारी पक्षातील सदस्य असतानाही गत वर्षाभरापासून येथील गटविकास अधिकाऱ्यांचे कायमस्वरुपी पद भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची शोकांतिका आहे़ सर्वपक्षीयांनी राजकीय ताकद पणाला लावून हे पद भरणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त होत आहे.