शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाल सुधारगृहातील ‘प्रभारी’ कारभार !

By admin | Updated: January 29, 2017 23:52 IST

लातूर शहरातील लेबर कॉलनी परिसरात असलेलया बालसुधार गृहातील कारभार ‘प्रभारी’वरच सुरु आहे.

राजकुमार जोंधळे  लातूरशहरातील लेबर कॉलनी परिसरात असलेलया बालसुधार गृहातील कारभार ‘प्रभारी’वरच सुरु असून, सातपैकी तीन पदे सध्याला रिक्त आहेत. एकाच आठवड्यात दोन अट्टल गुन्हेगाराने पलायन केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बाल सुधारगृहातील प्रशासनाच्या कारभारावराची लक्तरेच या गुन्हेगारांनी टांगली आहेत. येथील सुरक्षा व्यवस्था सहज भेदता येते. याची जाणिव झाल्यानंतरच या दोन गुन्हेगारांनी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सुधारगृहातून लपायन केले आहे. लेबर कॉलनी परिसरात २५ क्षमता असलेले बालगृह आणि २५ क्षमता असलेले निरीक्षणगृह आहे. या सुधारगृहात अल्पवयीन गुन्हेगारांची रवानगी केली जाते. येथे या गुन्हेगारांवर चांगले संस्कार करुन त्यांना सुधारण्याचे काम केले जाते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सुधारगृहाला अवकळा प्राप्त झाली आहे. सुधारगृहातील एकूण सात मंजूर कर्मचाऱ्यांची पदे आहेत. यामध्ये अधीक्षक, शिक्षक, लिपीक, स्वयंपाकी आणि चार काळजीवाहक अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. यापैकी काळजीवाहकाचे एक रिक्त तर एक पद न्याय प्रक्रियेत अडकले आहे. विशेष म्हणजे, अधीक्षक पदही प्रभारीच आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. आता पाचपैकी एक अधीक्षक आणि दोन काळजीवाक असे एकूण तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. अर्थात दोनच कर्मचाऱ्यांवर सध्याला सुधारगृहातील कामकाज सुरु आहे.