शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी बीडीओ दोन वेळा बदलले

By admin | Updated: June 13, 2014 00:39 IST

औंढा नागनाथ: येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नसल्याने विकासकामे मंदावली आहेत.

औंढा नागनाथ: येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नसल्याने विकासकामे मंदावली आहेत. विशेष म्हणजे एका महिन्यात दोनवेळा प्रभारी बीडीओ बदलल्यानंतर आता पं. स. चा कारभार पाहण्यासाठी कळमनुरी येथील सीडीपीओ (एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी) दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे बीडीओचा पदभार देण्यात आला आहे. औंढा नागनाथ येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून डॉ. सुनील भोकरे यांनी काही वर्षे काम केले. त्यांच्यानंतर पं. स.चा कारभार चालविण्यासाठी जि. प. प्रशासनाने एकाच महिन्यात दोन वेळा प्रभारी बीडीओ देण्याची किमया केली आहे. सध्या या पं. स. चा कारभार व्यवस्थित करण्यासाठी कळमनुरी येथील सीडीपीओ पदावर कार्यरत असलेले प्रकाश जोंधळे यांच्याकडे प्रभारी बीडीओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे; परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार ‘सीडीपीओ’ला पं.स. कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार जोंधळे यांची सध्या कळमनुरी पं. स. मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारीपदी नेमणूक झाली आहे. त्या अगोदरच औंढा पंचायत समितीला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पंडित रुजू झाले होते; परंतु जि. प. प्रशासनाने पंडित यांच्याकडे बीडीओचा पदभार न देता जोंधळे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.सध्या जोंधळे यांच्याकडे कळमनुरी मधील पं. स. चा सहाय्यक गटविकास अधिकारी, सीडीपीओ व औंढा येथील बीडीओ या तीन ठिकाणची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना औंढा पं. स. कार्यालयात वेळ देता येत नसल्याने पं. स. अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची गती मंदावली आहे. त्याच प्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामांची अनेक ठिकाणावरील मजुरांकडून मागणी होती; परंतु बीडीओकडे वेळच नसल्याने सदरील कामे पुढे ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे सिंचन विहिरी, पांदण रस्ते, बीआरजीएफ, घरकुल योजना लाभार्थ्यांची देयके रुकल्यामुळे कामे थांबली आहेत. त्यामुळे औंढा पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बीडीओंचा पदभार देण्यात यावा किंवा कायमस्वरुपी बीडीओ नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून करण्यात आली आहे. (वार्ताहर)विकासकामे मंदावलीऔंढा नागनाथ येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून डॉ. सुनील भोकरे यांनी काही वर्षे काम केले. त्यांची बदली झाली आहे.पंचायत समितीचा कारभार चालविण्यासाठी जि.प. प्रशासनाने एकाच महिन्यात दोन वेळा प्रभारी बीडीओ देण्याची किमया केली आहे.कळमनुरी येथील सीडीपीओ पदावर कार्यरत असलेले प्रकाश जोंधळे यांच्याकडे प्रभारी बीडीओची जबाबदारी देण्यात आली आहे.सध्या जोंधळे यांच्याकडे कळमनुरी मधील पं. स. चा सहाय्यक गटविकास अधिकारी, सीडीपीओ व औंढा येथील बीडीओ या तीन ठिकाणची जबाबदारी आहे.प्रभारी बीडीओंना कार्यालयात वेळ देता येत नसल्याने पं. स. अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची गती मंदावली आहे. औंढा तालुक्यातील सिंचन विहिरी, पांदण रस्ते, बीआरजीएफ, घरकुल योजना लाभार्थ्यांची देयके रुकल्यामुळे कामे थांबली आहेत.पुर्णवेळ अधिकाऱ्याची मागणी