नांदेड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ आॅगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे़ त्यानिमित्त शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मिरवणूका निघुन त्या अण्णाभाऊ साठे चौक, विद्युतभवन येथे विसर्जित होणार आहेत़ त्यामुळे काही मार्ग दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहे़ मिरवणुका मुख्यत: आयटीआय चौक- लॉ कॉलेज टी पॉर्इंट-महादेव दालमिल ते अण्णाभाऊ साठे पुतळा तसेच महाराणा प्रताप चौक नागार्जुना कॉर्नर ते अण्णाभाऊ साठे चौक व चिखलवाडी कॉर्नर-हिंगोली गेट अंडरब्रिज किंवा ओव्हरब्रिज ते अण्णाभाऊ साठे पुतळा या मार्गाने मिरवणूका येणार आहेत़ सदर मिरवणूकीमध्ये वाहने तसेच नागरिकांची गर्दी राहणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी सदरील मार्गावरील वाहतूक दुपारनंतर बंद करण्यात येणार आहे़ काही रस्ते बंद असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे़ लॉ कॉलेज टी पॉर्इंटकडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे न जाता लॉ कॉलेज, यशवंत कॉलेज रस्ता, बाबानगर, भाग्यनगर पुढे जाण्यासाठी राहील़ महाराणा प्रताप चौकाकडून अण्णाभाऊ साठे चौक ते चिखलवाडी कॉर्नरकडे जाण्यासाठी नागार्जुना टी पॉर्र्ईंट ते आनंदनगर चौक, भाग्यनगर, वर्कशॉप कॉर्नर या रस्त्याचा वापर करावा़ तसेच चिखलवाडी चौक, यात्रीनिवास, पोलिस चौकीकडून अंडर ब्रिज व ओव्हरब्रिजवरून अण्णाभाऊ साठे चौकाकडे जाणारा बंद करून पर्यायी वळण मार्ग यात्री निवास पोलिस चौकी, कोर्टाच्या पाठीमागील रस्ता, शिवाजी पुतळा, वजिराबाद चौक ते पुढे जाण्यासाठी खुला राहील़ वाहनधारकांनी मार्गातील बदल लक्षात घेवून ठरवून दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन नांदेड पोलिस शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी) जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२(१) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी १ आॅगस्ट रोजी सर्व दारू दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत़
शहरातील वाहतूक मार्गात बदल
By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST