शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बीआरजीएफच्या ६५ कामांमध्ये बदल

By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST

हिंगोली : मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत यापुर्वी निवडण्यात आलेल्या ६५ विविध कामांमध्ये बदल करण्यात येणार

हिंगोली : मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत यापुर्वी निवडण्यात आलेल्या ६५ विविध कामांमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी यापुर्वी निवडलेल्या कामांची पुनर्रपडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणारी कामे सुचविण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी विविध कामे सुचविली होती. त्यातील अनेक कामे मार्गी लागली; परंतु काही कामांमध्ये अडचणी येत असल्याने ती कामे बदलण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला होता; परंतु तसा ठराव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आलेला नव्हता. विशेष म्हणजे यापुर्वी जी कामे निवडण्यात आली होती. त्या कामांसाठी यापुर्वीच ग्रामपंचायतच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला होता. जवळपास २००९-१० पासून काम बदलाचे हे प्रकरण प्रलंबित होते. या संदर्भात काही दिवसांपुर्वी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी पाचही गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये हे प्रकरण समोर आले. त्यामुळे बनसोडे यांनी काम बंद संदर्भातील ग्रामसभेचा प्रस्ताव ग्रामसेवकांमार्फत मागवून घेण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ६५ कामांचे प्रस्ताव जानेवारी ते मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल झाले होते. या कामबदलास जिल्हा नियोजन मंडळाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. त्यामध्ये सदरील कामांमध्ये बदल करण्यापुर्वी ती कामे बदलणे आवश्यक आहे का? या बाबतची तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. अधिकारी यांनी पाचही गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या अहवालानंतर सदरील कामे बदलण्यावर शिक्का मोर्तब होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नियोजन समितीत झाली होती चर्चामागासक्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता विकास कामांचा निधी.निवडण्यात आलेली काही कामे बदलण्याचा निर्णय ग्रामसभेद्वारे घेतला होता ग्रामपंचायतींनी.काम बदलाच्या मंजुरीबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुर्नतपासणी करण्याचा झाला होता निर्णय.आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश