बीड: जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सर्वसाधारण बदल्यांच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी वित्त व लेखा, लघुपाटबंधारे, बांधकाम विभागातील बदल्या पार पडल्या. सीईओ नामदेव ननावरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिर्के यांची उपस्थिती होती. कॅफो राजन साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे हे ही उपस्थित होते. ११ वाजता जि.प.च्या सभागृहात समुपदेशनानुसार बदल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती बदल्या झाल्या. सुरूवातीला बांधकाम विभागातील बदल्या झाल्या. स्थापत्य अभियांत्रीकी पदाच्या बदल्यांसाठी आठ अर्ज आले होते. त्यापैकी तीन बदल्या प्रशासकीय तर एक विनंती बदली झाली. उर्वरित अपात्र ठरविण्यात आल्या. वित्त विभागामध्ये सहायक लेखाधिकारीपदाच्या बदलीसाठी तीन अर्ज आले होते. मात्र एकही बदली होऊ शकली नाही. कनिष्ट लेखाधिकारी पदाच्या चार प्रशासकीय बदल्या झाल्या. तर एक विनंती बदली झाली. लघुपाटबंधारे विभागात एकही बदली होऊ शकली नाही. प्रशासकीय बदलीसाठी एका तालुक्यात दहा वर्षे तर विनंती बदलीसाठी एका तालुक्यात पाच वर्षे सेवेची अट आहे. मात्र एकानेही अट पूर्ण केली नव्हती. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात दोन विनंती बदल्या झाल्या. बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी राजेंद्र गर्जे , वरिष्ठ सहायक संतोष गायकवाड यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
जि.प.मध्ये बदल्यांना प्रारंभ
By admin | Updated: May 13, 2015 00:27 IST