शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षणात बदल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:31 IST

वैद्यकीय शिक्षणाचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे हा कालावधी कमी करण्यासह वैद्यकीय शिक्षणात काही बदलांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. गिरीश मैंदरकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील वैद्यकीय शिक्षण परदेशातील पुस्तकांवर आधारित आहे. मात्र परदेशातील आणि भारतातील आजारांमध्ये फरक आहे. वैद्यकीय शिक्षणाचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे हा कालावधी कमी करण्यासह वैद्यकीय शिक्षणात काही बदलांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण धोरण समितीचे सदस्य, ‘एमसीआय’चे सदस्य तसेच कॉलेज आॅफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जनचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर यांनी दिली.इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनअंतर्गत इंडियन कॉलेज आॅफ रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग आणि महाराष्ट्र रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत रविवारी (दि.२९) डॉ. गिरीश मैंदरकर यांनी मार्गदर्शनकेले.याप्रसंगी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. देशात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्याअंतर्गत देशभरातील सहा तज्ज्ञांची राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण धोरण समिती बनविण्यात आली असून, त्यात डॉ. मैंदरकर यांचा समावेश आहे.वैद्यकीय शिक्षणात कोणते बदल आवश्यक आहेत, यासंदर्भात समिती शिफारशी करणार आहे. भारतात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, संसर्गजन्य आजार आढळतात. तुलनेत परदेशात वेगळे आजार आहेत. याचा विचार झाला पाहिजे. वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी साडेपाच वर्षांचा आहे. हा कालावधी साडेतीन ते चार वर्षांचा करावा, प्रात्यक्षिकांवर अधिक भर देणारा हवा, असे काही बदल सुचविण्यात आल्याचे डॉ. मैंदरकर यांनी सांगितले.