शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेडातूनच परिवर्तन शक्य- दराडे

By admin | Updated: January 17, 2016 23:56 IST

औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते,

औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम शास्त्रज्ञ व समाजसेवक बाळासाहेब दराडे यांनी रविवारी येथे केले.टेंडर केअर होम आणि इन्स्टिट्यूट आॅफ सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या ‘वेध’ या व्यवसाय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. ‘गरज की चैन’ हे सूत्र असलेल्या परिषदेत दराडे यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत शिक्षक मतीन भोसले, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या मानसी करंदीकर आणि केतकी घाटे या मान्यवरांनी अनुभव कथनातून आपला जीवनपट उलगडला. मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या मान्यवरांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. आपले शिक्षण, अमेरिकेतील करिअर, नासाबरोबर केलेले कार्य, अमेरिकेतून परतल्यानंतर ग्रामविकासाच्या कार्यात झोकून देऊन केलेले काम, याबाबत दराडे यांनी मनमोकळा संवाद साधला. ‘देशासाठी काही करायचे असल्यास त्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेची नव्हे, तर शुद्ध हृदयाची गरज आहे,’ असेही दराडे यांनी स्पष्ट केले. निसर्ग, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही करिअर व कामाचा भाग म्हणून स्वीकारली आहे. त्यातूनच आम्हाला जीवनाचा खरा अर्थ आणि आनंदही प्राप्त झाल्याचे मानसी करंदीकर, केतकी घाटे यांनी सांगितले. फासेपारधी समाजाने मुख्य प्रवाहात यावे या हेतूने त्यांच्या पाल्यांसाठी विशेष शाळा सुरूकरणाऱ्या भोसले यांनीही आपला जीवनप्रवास उलगडला. कुटुंबियांसोबत छान गप्पा मारणे, हे मला आॅस्करपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटते, अशा शब्दांत मृण्मयीने आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्योगाचे यश व कीर्ती हा सामाजिक ठेवाच असून, त्यामुळेच कामगार-कर्मचाऱ्यांना नफ्यामध्ये वाटा देण्याची पद्धत सुरू केल्याचे रायठठ्ठा यांनी नमूद केले.