शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत राठोड यांच्यासह काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: August 25, 2016 23:45 IST

औरंगाबाद : अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : पक्षादेश डावलून पक्षाचे सदस्य असलेल्या उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.या प्रकरणी सोनपेठ (जि. परभणी) नगर परिषदेच्या तत्कालीन उपाध्यक्षा पद्मा देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार सोनपेठ नगर परिषदेमध्ये नगरसेवकांची संख्या १७ असून यापैकी सात काँग्रेस पक्षाचे आहेत. काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि नगर परिषदेच्या उपाध्यक्ष देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव मांडून तो १७ विरुद्ध १४ मतांनी मंजूर करण्यात आला. काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र त्यापूर्वी ३ जुलै २०१२ रोजी पक्षादेश (व्हीप) काढून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करण्याचे आदेश काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी दिले होते. हा पक्षादेश ५ आणि ६ जुलैला लोकमत व इतर वर्तमानपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे प्रकाशितही करण्यात आला. मात्र पक्षादेश डावलून नगरसेवक चंद्रकांत राठोड, वैशाली कुसुमकर, शेख शाहेदबी अन्सार, दिगंबर पाटील, राज रईसबेगम जहिरोद्दीन, कुरेशी उस्मान कादरी यांनी मतदान केले. यावर या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे असा विनंती अर्ज उपाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला. मात्र तो फेटाळण्यात आला. या विरोधात देशमुख यांनी अ‍ॅड. सचिन देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.याचिकेत म्हणणे मांडण्यात आले, की संबंधित नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी काढलेला पक्षादेश डावलून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यांची ही कृती महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता कायदा १९८६ च्या कलम ३ चा भंग करणारी आहे. या प्रकरणी सुनावणीअंती खंडपीठाने याचिका मंजूर करीत सर्व सहा नगरसेवकांना अपात्र ठरविले. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरिता चार आठवडे स्थगिती देतानाच खंडपीठाने संबंधितांनी कोणतेही आर्थिक लाभ घेऊ नयेत, असेही आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात अ‍ॅड. सचिन देशमुख यांना अ‍ॅड. मजिद शेख आणि अ‍ॅड. सोमेश्वर मुंडीक यांनी सहकार्य केले.