शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा संघ ठरला चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:11 IST

: गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी झालेल्या फायनलमध्ये पुणे संघाने अलॉफ्ट डेकोरेटर संघावर तब्बल ८१ धावांनी मात करताना औरंगाबाद इन्स्टिट्यूट आॅफ क्रिकेटतर्फे आयोजित अखिल भारतीय निमंत्रित संघांची क्रिकेट स्पर्धा जिंकली. ऋषभ राठोड हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी झालेल्या फायनलमध्ये पुणे संघाने अलॉफ्ट डेकोरेटर संघावर तब्बल ८१ धावांनी मात करताना औरंगाबाद इन्स्टिट्यूट आॅफ क्रिकेटतर्फे आयोजित अखिल भारतीय निमंत्रित संघांची क्रिकेट स्पर्धा जिंकली. ऋषभ राठोड हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५९ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून ऋषभ राठोड याने स्फोटक फलंदाजी करताना ५५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांची वादळी खेळी केली. मधुर पटेलने १७ चेंडूंत एक षटकार व २ चौकारांसह २३, तर अभिनव पुरी व यश नहार यांनी प्रत्येकी १७ धावांचे योगदान दिले. अलॉफ्ट डेकोरेटर संघाकडून बबलू पठाण आणि सय्यद ए. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. सय्यद तल्हा, सुशील अरक, मोहमद इम्रान व अझीम कुरैशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अलॉफ्ट डेकोरेटर संघ १६.१ षटकांत ७८ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून अब्दुल कय्यूम (१४) व सय्यद जावेद (११) हेच दुहेरी आकडी धावा फटकावू शकले. पुणे संघाकडून शुभम कोठारी, पुनित त्रिपाठी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. विशाल गीतेने १६ धावांत २ गडी बाद केले. त्याआधी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीत पुणे संघाने सौराष्ट्र लॉयन्स संघाचा ४ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या लढतीत सौराष्ट्र लॉयन्सने प्रथम फलंदाजी करीत १९ षटकांत सर्वबाद १६५ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून विशाल जोशी याने ३९ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ७७ व कृष्णा पाठकने १९ धावांचे योगदान दिले. पुणे संघाकडून विशाल गीतेने २३ धावांत ५ गडी बाद केले. प्रसाद पाटील व पुनित त्रिपाठी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पुणे संघाने विजयी लक्ष्य १८ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून पुनित त्रिपाठीने ३७ चेंडूंत ५ षटकार व ७ चौकाारंसह नाबाद ७४ धावा केल्या. आशिष सूर्यवंशीने १५ चेंडूंत २ षटकार व एका चौकारांसह २७, अनिकेत पोनवालने १७ चेंडूंत एक षटकार व ३ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. सौराष्ट्र लायन्सकडून भावेश डोंगा व धवल सोनी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. या स्पर्धेत औरंगाबादचा सय्यद अरीज मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला, तर मोहंमद आमेरने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जिंकला.अंतिम सामन्यानंतर एआयओसीचे सरताज खान, नावीद हुसेन, तनवीर हुसैन, मुजाहेद व एजाज झैदी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.