औरंगाबाद : ऋषिकेश नायर याच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या बळावर कुंटे स्पोर्टस् संघाने एडीसीए मैदानावर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विनर्स अकॅडमीवर २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवताना विजेतेपदाला गवसणी घातली.अंतिम सामन्यात विनर्सने प्रथम फलंदाजी करीत ३0 षटकांत ८ बाद १६४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सलामीवीर श्रीनिवास कुलकर्णीने ४५ चेंडूंत ८ चौकारांसह ४९ आणि शशिकांत पवारने ५१ चेंडूंत ५ चौकार २ षटकारांसह ४९, करण लव्हेराने २४ आणि संकेश मोरेने १५ धावा केल्या. कुंटे स्पोर्टस्कडून सागर सपकाळने ३३ धावांत ४ व आकाश पाटीलने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात कुंटे स्पोर्टस्ने ऋषिकेश नायरच्या ३९ चेंडूंतील २ षटकार व १0 चौकारांसह फटकावलेल्या ७१ धावांच्या बळावर २८.२ षटकांत ८ बाद १६७ धावा फटकावत विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋषिकेशला सचिन हातोळेने ४ चौकार व एका षटकारासह २६ चेंडूंत ३२ धावा फटकावत सुरेख साथ दिली. आकाश पाटीलने १५ व विश्वास वाघुलेने १0 धावा केल्या. विनर्सकडून विशाल शेट्टेने ३, तर हरमितसिंग रागी व शशिकांत पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. श्रेयस गिल्डाने १ गडी बाद केला.अंतिम सामन्यानंतर उपमहापौर विजय औताडे, संघटनेचे उपाध्यक्ष पारस छाजेड, आजीव सभासद मोहन बोरा यांच्यासह ज्येष्ठ खेळाडू दिनेश कुंटे, शेख हबीब, प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा, दीपक पाटील, सय्यद जमशीद यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले.स्पर्धेचे मानकरीमालिकावीर : करण लव्हेराफलंदाज : श्रीनिवास कुलकर्णीगोलंदाज : रोहित देवरेसामनावीर : ऋषिकेश नायर
कुंटे स्पोर्टस् संघ बनला चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:52 IST
ऋषिकेश नायर याच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या बळावर कुंटे स्पोर्टस् संघाने एडीसीए मैदानावर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विनर्स अकॅडमीवर २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवताना विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात विनर्सने प्रथम फलंदाजी करीत ३0 षटकांत ८ बाद १६४ धावा फटकावल्या.
कुंटे स्पोर्टस् संघ बनला चॅम्पियन
ठळक मुद्देअंडर १९ क्रिकेट स्पर्धा : अंतिम सामन्यात विनर्स अकॅडमीवर २ गडी राखून रोमहर्षक मात