शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘हज’च्या सुधारित धोरणास आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:39 IST

हजला जाण्यासाठी इच्छुकांपैकी चार वर्षांपासून सतत अर्ज करणाºयांना प्राधान्य देण्याचे धोरण वगळण्याच्या भारतीय हज समितीच्या (हज कमिटी आॅफ इंडिया) २०१८-२२ सालासाठीच्या सुधारित धोरणास औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हजला जाण्यासाठी इच्छुकांपैकी चार वर्षांपासून सतत अर्ज करणाºयांना प्राधान्य देण्याचे धोरण वगळण्याच्या भारतीय हज समितीच्या (हज कमिटी आॅफ इंडिया) २०१८-२२ सालासाठीच्या सुधारित धोरणास औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. व्ही. एल. आचलिया यांच्या खंडपीठाने प्रतिवादींनानोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी४ जानेवारी २०१८ रोजी होणारआहे.प्रतिवादी केंद्र शासनाच्या विदेश मंत्रालय (हज सेल) आणि अल्पसंख्याक विभाग तसेच भारतीय हज समितीच्या वतीने असिस्टंट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे यांनी आणि महाराष्ट्राचा अल्पसंख्याक कल्याण विभाग आणि महाराष्टÑाच्या हज समितीतर्फे सहायक सरकारी वकील एस.बी. पुलकुंडवार यांनी नोटिसा स्वीकारल्याआहेत.याचिकाकर्ते सय्यद इलियास सय्यद अब्बास (६०), सनतअली खान अब्दुल रहेमान खान (६३), मोहंमद अक्बर खान मोहंमद इब्राहीम खान (५८) आणि अमजद खान अब्दुल्ला खान पठाण (५६) यांनी अ‍ॅड. जी.आर. सय्यद यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.हाजींची निवड करण्याचे २०१३-१७ साठीचे धोरणयाचिकेत म्हटल्यानुसार भारतीय हज समितीच्या हजला जाण्यासाठी इच्छुकांची निवड करण्यासाठीच्या २०१३-२०१७ सालासाठीच्या धोरणात ७० वर्षांपेक्षा जादा वयाचे ज्येष्ठ नागरिक, सतत चार वर्षांपासून हजसाठी अर्ज करणारे आणि सर्वसाधारण (ओपन) अशा तीन गटांतील अर्जदारांना प्राधान्य दिले जात होते.हाजींची निवड करण्याचे २०१८-२२ साठीचेसुधारित धोरणमात्र, २०१८-२२ च्या सुधारित धोरणानुसार सतत चार वर्षांपासून हजसाठी अर्ज करणाºयांना प्राधान्य देण्याबाबतचे धोरण वगळले आहे. सुधारित धोरणानुसार आता केवळ ७० वर्षांपेक्षा जादा वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसाधारण (ओपन)अशा दोन गटातील अर्जदारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून सतत अर्ज करणाºयांवर अन्याय झाला आहे. सतत चार वर्षांपासून हजसाठी नंबर लागण्याच्या प्रतीक्षेत असणाºया अर्जदारांसह औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी येथील अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे.याचिकाकर्त्यांची विनंती२०१८ साली हजला जाण्यासाठी इच्छुकांची निवड करण्यासाठीची सोडत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. म्हणून सतत चार वर्षांपासून हजसाठी अर्ज करणाºया याचिकाकर्त्यांसह इतरांच्या अर्जांचा २०१८ साली हजला जाण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच सतत चार वर्षांपासून हजसाठी अर्ज करणाºयांना प्राधान्य देण्याबाबतचे धोरण वगळण्याचा भारतीय हज समितीचा निर्णय रद्दबातल करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.