शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कलाकाराला दररोज परीक्षेचे आव्हान - वंदना गुप्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:14 IST

प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.

ठळक मुद्देऔरंगाबाद : नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ४१ व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर उपस्थित होते. यावेळी वंदना गुप्ते यांनी नाट्य क्षेत्रातील चढ-उतार मांडले. रंगमंचावर पहिली उडी धोकादायक असते. ती एकदा घेतली की, सगळ्या गोष्टी होत राहतात. पहिल्या नाटकाच्या प्रयोगावेळी दडपणात होते. तरीही मागील ४६ वर्षांच्या काळात तब्बल १२ हजार ६२९ प्रयोग रंगभूमीवर केव्हा केले, याचे कोडे उलगडत नसल्याचे गुप्ते म्हणाल्या. कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असला पाहिजे. त्याला प्रत्येक प्रयोगातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. नाट्य क्षेत्रात आपण एकेक पायरी वर चढत असतो. ती कायम चढतच राहावी लागते. जेव्हा आपण पायरी चढण्याचे थांबतो अन् मला सगळे येते म्हणून खाली वाकून पाहतो, तेव्हा आपण संपलेलो असतो, हे प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवले पाहिजे, असेही वंदना गुप्ते यांनी स्पष्ट केले. शेवटी ‘झुंज’ नाटकातील प्रसिद्ध डायलॉग सादर करीत भाषणाचा शेवट केला. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. यात त्यांनी नाट्यप्रेमींसाठी लागणाºया सर्व सोयी-सुविधा विद्यापीठ प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले. यात त्यांनी महोत्सवाच्या ऐतिहासिकतेचा आढावा घेतला.पाहुण्यांचा परिचय प्रा. स्मिता साबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. राखी सलगर यांनी केले. आभार प्रा. सुनील टाक यांनी मानले.