शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘चक्का जाम’.. प्रशासनाला घाम..!

By admin | Updated: January 31, 2017 23:30 IST

बीड :आवेशपूर्ण वातावरणात मंगळवारी जिल्हाभर मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन झाले.

 डौलात फडकणारे भगवे झेंडे.... डोक्यावर ‘एक मराठा- लाख मराठा’ असा संदेश असलेल्या टोप्या.... छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष अन् आरक्षण आमच्या हक्काचे....!, एकच मिशन... मराठा आरक्षण अशा घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... अशा आवेशपूर्ण वातावरणात मंगळवारी जिल्हाभर मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन झाले. प्रशासनाला घाम फोडणाऱ्या या आंदोलनाला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने भरउन्हात रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी सकाळी ११ वाजता बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समाजबांधव एकवटले. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊवंदना घेण्यात आली. यावेळी पक्ष, संघटनांचे जोडे बाजूला ठेवून पदाधिकाऱ्यांनी एकीचे दर्शन घडविले. चौकाच्या चारही रस्त्यांवर समाजबांधवांनी ठिय्या देत प्रचंड घोषणाबाजी केली. महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. कोणाच्या नेतृत्वाशिवाय झालेल्या या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. ‘एकच मिशन, मराठा आरक्षण...’ आरक्षण देत कसे नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाहीत... कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी झालीच पाहिजे...अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये बदल झालाच पाहिजे...अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचाही जयघोष करण्यात आला. दुपारी १ वाजता राष्ट्रगीत घेऊन चक्काजाम आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनाच्या अनुषंगाने बशीरगंज, तहसील कार्यालय, मोंढा नाका, बार्शी नाका येथून दुचाकी वाहने वळविण्यात आली होती. रस्त्यावर रिक्षा व स्थानिकचे मालवाहू वाहने धावली नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळाला. दुपारनंतर जनजीवन पूर्वपदावर आले.बीड तालुक्यातील घाटसावळी, पेंडगाव, म्हाळस जवळा, मांजरसुंबा, नेकनूर येथेही आंदोलने झाली.गेवराई, पाटोदा, माजलगाव, धारुर, अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर, वडवणी, केज येथेही आंदोलन झाले. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. वाहने अडकलीचक्काजाम आंदोलनामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बीडमध्ये बसस्थानक व बार्शी रोडवर मालवाहू वाहने अडकून पडली होती. सकाळी ११ वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी १ वाजेपर्यंत चालले. क्रांती मोर्चाची चक्काजामवर छापमराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते. सकाळपासून ठिकठिकाणच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी नेमला होता. मराठा क्रांती मोर्चात दिसलेल्या स्वयंशिस्तीची छाप चक्काजाम आंदोलनातही दिसून आली. एकाचवेळी हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले ;पण एकही अप्रिय घटना घडली नाही.धारुर दोन तास ठप्पधारुरात मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आंदोलनास मुस्लिम व बहुजन समाजानेही पाठिंबा दिला. घोषणांनी परिसर दणाणला. समारोपप्रसंगी गांजपूरचे भूमिपुत्र शहीद जवान विकास समुद्रे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तालुक्यातील चोरंबा, तेलगाव, अंबेवडगाव, अंजनडोह येथेही चक्काजाम आंदोलन झाले. यामुळे ठिकठिकाणी प्रवासी अडकून पडले. आर्वीत आंदोलनाला प्रतिसादमंगळवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला शिरूर तालुक्यातील आर्वी येथे नागरिकांनी तासभर रास्ता रोको करून प्रतिसाद दिला. गावकऱ्यांनी व्यवहार बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला. शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी समयोचित भाषणेही झाली. तासभर वाहतूक ठप्प झाली होती.घोषणाबाजीने आंदोलनात उत्साहया आंदोलनात १२ वर्षीय ज्ञानेश्वर सोळुंके हा विद्यार्थीही सक्रिय सहभागी झाला होता. अत्यंत त्वेषाने घोषणाबाजी करून आंदोलकांत उत्साह भरविण्याचे काम त्याने केले. आरक्षण, कोपर्डी प्रकरण, शेतीमालाला भाव या सर्व मुद्द्यांवर त्याने प्रभावीपणे मत मांडले. वडवणीत दोन तास आंदोलनयेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यमार्गावर चक्काजाम करण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी १ असे दोन तास आंदोलन झाले. घोषणांनी परिसर दणाणला. मुलींच्या हस्ते नायब तहसीलदार एस. डी. रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील कुप्पा, मोरवडफाटा येथेही आंदोलन झाले. घाटनांदूरमध्येही आंदोलनयेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन झाले. भर उन्हात मराठा समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बालकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ वंदना घेण्यात आली. वक्रतुंड बचतगटाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पट्टीवडगाव, भानवाडी, जोडवाडी, वाकडी, साळुंकवाडी, मुरंबी, चोथेवाडी येथील मराठा बांधव उपस्थित होते. पाटोद्यात उत्स्फूर्तपणे आंदोलनशहरासह खेड्यापाड्यातही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वयंस्फूतीने समाजबांधव रस्त्यावर उतरला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनास हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. चुंबळी फाटा, लिंबादेवी, पिंपळवंडी, अंमळनेर, पांढरवाडी फाटा येथेही आंदोलन झाले. चक्काजाममुळे वाहतूक ठप्प होती. (प्रतिनिधी)