शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला

By admin | Updated: August 30, 2016 01:19 IST

औरंगाबाद : एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले. ही घटना २८ आॅगस्ट रोजी सकाळी स्वराजनगर येथे घडली.

औरंगाबाद : एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले. ही घटना २८ आॅगस्ट रोजी सकाळी स्वराजनगर येथे घडली. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याविषयी नागसेन जोगदंडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला घरी असताना जोगदंड धारदार शस्त्र घेऊन आला. यावेळी त्याने शिवीगाळ करून तुम्हाला येथे राहू देणार नाही, तुमचा खून करीन, अशी धमकी देऊन चाकूने वार करून जखमी केले.दोन वाहनचालकांवर अपघातप्रकरणी गुन्हा औरंगाबाद : भरधाव आणि हलगर्जीपणाने वाहने चालवून समोरासमोर टक्कर देणाऱ्या दोन वाहनचालकांविरोधात सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारचालक मुंजा मुंढे (रा. देवतपूर, ता. परळी, जि. बीड) आणि मोटारसायकलचालक मिलिंद साबळे (रा. सिद्धार्थनगर, हडको) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, २८ आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता स्वामी विवेकानंद उद्यानासमोरील रोडवर दुचाकीचालक राँग साईडने तर कारचालक वेगात आल्याने त्यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी सहायक फौजदार देवराव दांगोडे यांनी सरकार पक्षातर्फे तक्रार दाखल केली.चारित्र्याच्या संशयावरून जावयाला मारहाणऔरंगाबाद : दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून पत्नीसह सासरच्या मंडळींनी एक जणाला बुटाने मारहाण क रून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना हडकोतील यादवनगर येथे २८ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. प्रमोद गायकवाड आणि तीन महिलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, उन्मेष खाबडे हे घरी असताना त्यांचा मेहुणा प्रमोद, मावस सासू आणि अन्य नातेवाईक तेथे आले. त्यांनी उन्मेष यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. भाड्याने घेतलेली कार पळविलीऔरंगाबाद : भाड्याने घेतलेली कार परस्पर गायब केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी सिडकोतील आंबेडकर पुतळ्याजवळ घडली. सौदागर सपकाळ (रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा) आणि ज्ञानेश्वर ऊर्फ बाळू कुलथे (रा. मिसारवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. मेनीनाथ जाधव यांचा टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. २५ एप्रिल रोजी आरोपींनी त्यांच्याकडून कार भाड्याने नेली. त्यानंतर ती कार त्यांना परत न करता आरोपींनी ती गायब केली.