शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला, १ गंभीर

By admin | Updated: January 7, 2017 21:22 IST

जुन्या भांडणातून दोन शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ७ -  जुन्या भांडणाच्या कारणावरुन हर्सूल आणि भारतमातानगर येथील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी  एका विद्यार्थ्याने केलेल्या चाकूहल्लयात दोन मुले जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असून तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास हडकोतील भारतमातानगर रोडवर घडली. याप्रकरणी रात्रीउशीरापर्यंत  सिटीचौक पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला नव्हता.
रोहित वसंत खरात (१६,रा. सुभाषचंद्रबोस नगर,हडको एन-११ ) , अजीत थोरात अशी जखमींची नावे आहेत. रोहितची प्रकृती चिंताजनक असून त्याला जळगाव रोडवरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगतले की, रोहित हा जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेत दहावीमध्ये शिकतो. शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी त्याचे मित्र अजीत थोरात,निखील खरात आणि अजय कासारे हे शनिवारी सकाळी रोहितच्या घरी दुचाकीने गेले. एकाच दुचाकीवर चौघांना शाळेत जाणे शक्य नसल्याने रोहितच्या घरी दुचाकी उभी करून ते रिक्षाने शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. एसपीआयजवळून ते जात असताना हर्सूल येथील ७ ते ८ विद्यार्थ्यांनी त्यांना गाठले आणि  त्यांच्याशी वाद सुरू केला.यावेळी एका मुलाने  चाकूने  रोहित व अजीतवर सपासप वार सुरू केले.यात रोहित याच्या पोटावर,पाठिवर तर अजीतच्या हातावर त्याने वार केल्याने ते रक्तबंबाळ झाले. या हल्लयानंतर  ही मुले तेथून पळून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहित आणि अजीतला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवून घेतला. याविषयी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.