शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापती निवडीची उत्सुकता शिगेला !

By admin | Updated: March 12, 2017 23:12 IST

कळंब : १४ मार्च रोजी कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपदाचा फैसला होणार असल्याने याबाबची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे

कळंब : १४ मार्च रोजी कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपदाचा फैसला होणार असल्याने याबाबची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. सभापतीपदासाठी गुणवंत साहेबराव पवार, तर उपसभापतीपदासाठी प्रभावती भागवत आडसूळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.कळंब पं.स.मध्ये १६ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादीने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. मागील पाच वर्षे सेनेच्या ताब्यात पंचायत समिती होती. त्या काळात येरमाळा, दहिफळ या गणाकडे प्रत्येकी अडीच वर्षे, तर इटकूर व मस्सा (खं) या गणांकडे उपसभातीपद होते. या निवडणुकीत सेनेच्या संख्याबळ घसरून सहावर आल्याने सभापती-उपसभापतीपद निर्विवादपणे राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याचे स्पष्ट आहे. या पदासाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीकडून सर्वसाधारण प्रवर्गातून तीन, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून चार असे सात उमेदवार या दोन्ही पदासाठी आहेत. या जागांवर आपल्याच गटाच्या सदस्यांची वर्णी लागावी यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादीतील सर्वच गट पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरून आहेत. यासाठी प्रत्येकी १० महिने सभापती-उपसभापतीपदाचा बाजार समिती फॉर्म्युलाही पुढे करण्यात आला आहे. याबाबत पक्षाचे जिल्हास्तरीय नेतृत्वही अनुकूल असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. पं.स. सभापतीपदासाठी बाजार समिती फॉर्म्युला केला, तर या दोन्ही पदांवर सहा जणांचा पहिल्या अडीच वर्षात काम करण्याची संधी मिळणार आहे, तसेच पक्षांतर्गत नाराजीही टाळता येणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? त्यावरच या फॉर्म्युल्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कळंब पं.स.च्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास ९५ गावांवर लक्ष ठेवता येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता या पदावर सक्षम व जनसंपर्क असणाऱ्या पं.स. सदस्या संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांधून होत आहे. सेना-काँग्रेसच्या पं.स. मधील सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतला दुजाभावाची वागणूक मिळाली होती. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी सक्षम पदाधिकारी यावेत, अशी मागणी पक्षातून होते आहे.(वार्ताहर)