शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बाटाच्या सीईओपदी

By | Updated: December 2, 2020 04:11 IST

प्रथमच भारतीय व्यक्ती बाटाच्या सीईओपदी प्रथमच भारतीय व्यक्ती नवी दिल्ली : स्वित्झर्लंडस्थित पादत्राणे उत्पादक कंपनी बाटाच्या जागतिक सीईओपदी संदीप ...

प्रथमच भारतीय व्यक्ती

बाटाच्या सीईओपदी

प्रथमच भारतीय व्यक्ती

नवी दिल्ली : स्वित्झर्लंडस्थित पादत्राणे उत्पादक कंपनी बाटाच्या जागतिक सीईओपदी संदीप कटारिया यांच्या रूपाने प्रथमच एका भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. ही कंपनी तब्बल १२६ वर्षे जुनी आहे. कटारिया हे २०१७ पासून बाटा इंडियाचे सीईओ आहेत. ते आता ॲलेक्स नसरद यांची जागा घेतील.

...............

‘एफसीसी’चे चेअरमन

अजित पै होणार पायउतार

नवी दिल्ली : अमेरिकेच्या केंद्रीय दळणवळण आयोगाचे चेअरमन अजित पै हे येत्या २० जानेवारी रोजी आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ज्यादिवशी सत्ताग्रहण करणार आहेत, त्याच दिवशी पै हे पदावरून पायउतार होतील. आधीचे एफसीसी चेअरमन टॉम व्हीलर यांनी २० जानेवारी २०१७ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणाच्या दिवशी पद सोडले होते.

..................

कर्मभूमी ॲपद्वारे मिळाल्या

८ हजार आयटी नोकऱ्या

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कर्मभूमी ॲपद्वारे ८ हजार आयटी व्यावसायिकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. प. बंगालचे आयटी विभागाचे संयुक्त सचिव संजय दास यांनी सांगितले की, कोविड-१९ च्या महामारीमुळे राज्यात आयटी व्यावसायिक मोठ्या संख्येने बाहेरून आले आहेत. कर्मभूमी ॲप हे व्यावसायिकांच्या कौशल्य नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

..................

स्मार्टफोनच्या जागतिक

विक्रीत ५.७ टक्के घसरण

नवी दिल्ली : २०२० या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनची वार्षिक आधारावरील जागतिक विक्री ५.७ टक्क्यांनी घसरून ३६.६ कोटी युनिट‌्स‌वर खाली आली. गार्टनरने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक आधारावरील ‘एंड यूजर’च्या पातळीवरील एकूण विक्री ८.७ टक्क्यांनी घसरून ४०.१ कोटी युनिट‌्स‌वर आली. या विक्रीत २२ टक्के हिस्सेदारीसह सॅमसंग पहिल्या स्थानी असून, त्यापाठोपाठ १४.१ टक्के हिस्सेदारीसह हुआवी दुसऱ्या स्थानी आहे.

................