शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

११ विद्यार्थ्यांवरच चालते केंद्रीय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:49 IST

वसमत येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळेत पाच वर्गात फक्त ११ मुलांचा प्रवेश आहे. त्यातील शाळेत फक्त ३ मुलेच मंगळवारी पहावयास मिळाली. पाच वर्ग शिक्षकसंख्या ३ व विद्यार्थी हजर फक्त ३ अशी विचित्र अवस्थेत वसमत शहरातील ही केंद्रीय शाळा चालत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय नूतन शाळेत पाच वर्गात फक्त ११ मुलांचा प्रवेश आहे. त्यातील शाळेत फक्त ३ मुलेच मंगळवारी पहावयास मिळाली. पाच वर्ग शिक्षकसंख्या ३ व विद्यार्थी हजर फक्त ३ अशी विचित्र अवस्थेत वसमत शहरातील ही केंद्रीय शाळा चालत आहे.वसमत तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. एकीकडे डीजीटल शाळा करण्यावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे डिजिटल शाळांत शिक्षक मोबाईलवर व्यस्त झाल्याचेही चित्र आहे. ९० टक्के शिक्षक अपडावून करत असल्याने शिक्षणाचा बट्याबोळ होत आहे. शिक्षकांच्या अपडावूनवर अनेक शाळांचे वेळापत्रक ठरत असते. त्याला सुधारण्याची तसदी कोणी घेताना दिसत नाही.वसमत शहरात जिल्हा परिषदेची नूतन केंद्रीय शाळा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ही शाळा आहे. या शाळेत तीन शिक्षकही तैनात आहेत. शहरात मुख्य रस्त्यावर सुसज्ज इमारतीत ही शाळा आहे. मात्र या शाळेचा हजेरीपट पाहिला तर फक्त ११ विद्यार्थी या शाळेत आहेत हे पहावयास मिळते. त्यात इयत्ता पहिलीला १, दुसरी २, तिसरीला ३, चौथीला १ तर पाचवीला ५ जणांचा प्रवेश असल्याचे धक्कादायक चित्र आहे.सदर प्रतिनिधीने शाळेला भेट दिली असता एका वर्गात ३ विद्यार्थी आढळले. त्यांना विचारले असता त्यातील एक पाचवीचा एक तिसरीचा तर दुसरीचा विद्यार्थी होता. त्या तिघांना एकत्र बसवून एक शिक्षिका शिकवण्याचे काम करत होत्या. फक्त ३ विद्यार्थ्यांवर ही शाळा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार पहावयास मिळाला. आता या शाळेत शिक्षक कसे शिकवत असतील व विद्यार्थी कसे घडत असतील, हा शोधाचाच विषय आहे.