उस्मानाबाद : नगर जिल्ह्यातील जवखेडा येथे घडलेली हत्याकांडाची घटना ही अमानवीय असल्याचे सांगत या घटनेची सबीआयमार्फत चौकशी करून प्रत्यक्ष आरोपी आणि त्यामागील सूत्रधार शोधून काढावेत. तसेच त्यांना फाशीची शिक्षा देऊन जातीयवादी, वर्णव्यवस्थावादी आणि धर्मवादी शक्तींना कायद्याचा धाक दाखवून द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीयांच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली.जवखेडा येथील हत्याकांड प्रकरणी विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकल्यानंतर तेथे काही काळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात अशा घटनांतून देशविरोधी कृत्य करणाऱ्या, लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या नराधमांना वचक बसेल असे ठोस पाऊल शासनाने उचलणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या घटनेतील हत्यारे अद्याप फरार असल्याने राज्यातील अल्पसंख्यांक व दलित समाजात संताप आणि दहशत निर्माण झाली आहे. त्यासाठी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसाना द्यावेत. अन्यथा पुढील काळात असे हत्याकांड घडविणाऱ्या वृत्तींच्या विरोधात जिल्हाभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनात संविधान फौैंडेशनचे सुजीत ओव्हाळ, हुंकार बनसोडे, जिल्हा पत्रकार संघाचे महेश पोतदार व इतर पदाधिकारी, भाजपाचे अॅड. रेवण भोसले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद रोकडे, यांच्यासह एमआयएम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अकबरखान पठाण, प्रसेना प्रतिष्ठानचे प्रसेनजीत सरवदे, बसपाचे जिल्हा प्रभारी संजयकुमार वाघमारे, महाराष्ट्र वाहनचालक बहुजन महासंघाचे उत्तम घरबुडवे, धनंजय शिंगाडे युवा प्रतिष्ठानचे विशाल शिंगाडे तसेच रविराज माळाळे, भैय्यासाहेब नागटिळे, नंदकुमार हावळे, सुशील गायकवाड महेश जानराव, बंटी ओहाळ, सुखदेव सोनवणे, यशवंत शिंदे, नरेंद्र वाघमारे, मुजाहीद शेख, मुशताक शेख, सिध्दांत बनसोडे, नरेन वाघमारे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिराज्याभिषेक सोहळा समिती, सरस भारत अकादमी, बहुजन विद्यार्थी समाज सेवा मंडळ, भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन, रिपब्लिक सेना आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)तुळजापूर : जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ तुळजापूर येथे रिपाइं (आठवले गट), भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी संघटना यांच्यासह इतर संघटनांच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रिपाइं मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, तुळजापूर तालुकाध्यक्ष एस. के. गायकवाड, शहराध्यक्ष अरूण कदम, भारिपचे ल्हिाध्यक्ष मिलिंद रोकडे, स्वाभिमानी संघटनेचे संजय शितोळे, समाधान कदम, शिवा कदम, बापू सिध्दगणेश, बाबूराव कदम, तानाजी डावरे, टिल्लू कदम, सुकेशन ढेपे, विलास कदम, जयदेव कदम, पांडु वाघमारे, रावसाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.
हत्याकांडाची चौकशी सीबीआयमार्फत करा
By admin | Updated: October 30, 2014 00:26 IST