रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करावे यासाठी ग्रामस्थ, तसेच कामगारांनी जोगेश्वरी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत सरपंच गजाजन बोंबले, अमोल लोहकरे, उपसरपंच प्रवीण दुबिले, ग्रामविकास अधिकारी बी.एल. भालेराव व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेतला. ग्रामनिधीतून खर्च करून साई उद्योगनगरी ते मुख्य कमळापूर या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. शनिवारी या कामाचे भूमिपूजन सरपंच गजाजन बोंबले, अमोल लोहकरे, उपसरपंच प्रवीण दुबिले आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच योगेश दळवी, माजी उपसरपंच नजीरखॉ पठाण, सदस्य प्रभाकर काजळे, पंडित पनाड, विलास सौदागर, कृष्णा काजळे, गणेश ठोकळ, मोईस शेख, रामेश्वर आरगडे, प्रवीण थोरात, सुरेश वाघमारे, किशोर बिलवाल, अनिल वाघ, रफिक पटेल, अश्पाक बेग, मनोहर लोहकरे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ
जोगेश्वरी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामनिधीतून साई उद्योगनगरी-कमळापूर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे भूमिपूजन करताना सरपंच गजाजन बोंबले, अमोल लोहकरे, योगेश दळवी, नजीरखॉ पठाण आदी.